Apple Wonderlust Event 2023 : अॅपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. कंपनीने आपल्या इव्हेंटमध्ये आयफोन १५ सिरीज आणि वॉच सिरीज ९ लॉन्च केली आहे. कंपनीने आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस या मॉडेलच्या किंमतीदेखील जाहीर केल्या आहेत.आयफोन १५ ची सुरुवातीची किंमत ७९९ डॉलर्स इतकी असणार आहे. तर आयफोन १५ प्लसची सुरुवातीची किंमत ही ८९९ डॉलर्स असणार आहे. कंपनीने आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स देखील सादर केले आहेत. कंपनीने आयफोन १५ प्रो मॉडेल्समध्ये अॅक्शन बटण दिले आहे. ज्याचे मदतीने वापरकर्त्यांना अनेक कामे करता येणार आहेत.
Apple Event 2023 iPhone 15 Launch : जाणून घ्या
आयफोन १५ प्रो मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला कमी प्रकाशातील फोटो काढण्याचे फिचर मिळणार आहे. तसेच यात तुम्हाला 3X टेलीफोटो लेन्स आणि 5X ऑप्टिकल झूम फिचर मिळणार आहे. १२मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्ससह वापरकर्त्यांना मॅक्रोकामेरा देखील मिळणार आहे.
कंपनीने आयफोन १५ प्रो मॉडेल्समध्ये अॅक्शन बटण दिले आहे. ज्याचे मदतीने वापरकर्त्यांना अनेक कामे करता येणार आहेत.
कंपनीने आयफोन १५ व १५ प्लस पाठोपाठ आयफोन १५ प्रो सिरीज लॉन्च केली आहे. यामध्ये टायटॅनियम बॉडीचा वापर करण्यात आला आहे. बेजल देखील कमी करण्यात आले आहे. तुम्ही आयफोन १५ प्रो आणि १५ प्रो मॅक्स अनुक्रमे ६.१ आणि ६.७ इंचाच्या डिस्प्लेसह खरेही करू शकता.
Photo credit- (Indian Express/ Nandagopal Rajan )
कंपनीने आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस या मॉडेलच्या किंमतीदेखील जाहीर केल्या आहेत.आयफोन १५ ची सुरुवातीची किंमत ७९९ डॉलर्स इतकी असणार आहे. तर आयफोन १५ प्लसची सुरुवातीची किंमत ही ८९९ डॉलर्स असणार आहे. अजून कंपनीने भारतातील किंमती जाहीर केलेल्या नाहीत.
कंपनीने आपले आयफोन १५ आणि आयफोन ५ प्लस हे मॉडेल लॉन्च केले आहेत. यामध्ये आता obtrusive नॉच मिळणार नाही आहे. प्रो मॉडेलप्रमाणेच यामध्ये पिल शेपचे डायनॅमिक आयलंड असणार आहे. डिस्प्लेचा ब्राइटनेस हा २००० नीट्स इतका असणार आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा हे दुप्पट आहे. आयफोन १५ च्या डिस्प्लेचा आकार ६.१ इंच आणि आयफोन १५ प्लस डिस्प्लेचा आकार ६.७ इंच असणार आहे. दोन्ही मॉडेल्सना सिरॅमिक ग्लासचे संरक्षण देण्यात आले आहे.
कंपनीने आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस लॉन्च केले आहेत. त्यात ग्राहकांना ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.
आयफोन १५ च्या कॅमेऱ्यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. पोट्रेट फोटोग्राफीसाठी पोट्रेट मोड सिलेक्ट करण्याची गरज नाही. कॅमेरा आता ऑटोमॅटिक पद्धतीनेच पोट्रेट फोटो काढणार आहे.
Apple वॉच SE च्या नवीन मॉडेलची सुरुवातीची किंमत २९९ डॉलर्स इतकी आहे. तर Apple वॉच सिरीज ९ आणि वॉच अल्ट्रा २ तुम्ही अनुक्रमे ३९९ व ७९९ डॉलर्समध्ये खरेदी करू शकता. प्री ऑर्डर आजपासून सुरु झाली आहे.
कंपनीने मागच्या वर्षी Apple वॉच अल्ट्रा लॉन्च केले होते. कंपनी आता याची नेक्स्ट जनरेशन घेऊन आली आहे. यामध्ये तुम्हाला मोठी स्क्रीन आणि वॉच ९ मधील सर्व फीचर्स मिळणार आहेत.
२०३० पर्यंत कंपनीची झिरो न्यूट्रल प्रॉडक्ट्स तयार करणार आहे असे सीईओ टीम कूक म्हणाले. सिरीज आय वॉच मध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाची संकल्पना अंगिकाराण्यात आली आहे. यात वापरण्यात येणारे सर्व साहित्य पुनर्वापर करुन वापरण्यात आले आहे.
अॅपल वॉच सिरीज ९ ही पुन्हा रिडिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये S9 चिप आहे. ही चिप कोणत्याही Apple वॉचवर सर्वात वेगवान कस्टम सिलिकॉन आहे. यामध्ये नवीन न्यूट्रल इंजिन असेल आणि हे वॉच सिरी कमांडची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करते. तसेच या सिरीजमधील वॉचचा ब्राइटनेस २००० नीट्स इतका असणार आहे.
iPhone 15 Launch Live: Wonderlust इव्हेंटमध्ये लॉन्च झाली Apple वॉच ९ सिरीज; 'या' भाषांमध्ये असणार उपलब्ध
Apple व्हिजन प्रो ने आमच्या डेव्हलपर्सचे देखील लक्ष वेधून घेतले आहे. या गोष्टीमुळे आम्ही खूप उत्साहित आहोत असे टीम कूक म्हणाले.
Apple कंपनीच्या इव्हेंटच्या सुरुवातीला Apple वॉचने लोकांचा जीव वाचवला हे सांगण्यात आले.
Apple कंपनीचा Wonderlust इव्हेंट सुरूझाला आहे. सुरूवातीला कंपनीचे सीईओ टीम कूक बोलत आहेत.
प्रतीक्षा संपली; सुरू झाला आयफोन १५ सिरीजचा लॉन्चिंग इव्हेंट
निश्चितच आयफोन १५ प्रो आणि १५ प्रो मॅक्स मध्ये जास्त फिचर मिळतील. मात्र आयफोन १५ सिरिजमधील बेस मॉडेलकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आयफोन १५ सिरीजच्या बेस मॉडेल्समध्ये नॉच मिळण्याची शक्यता कमी आहे. यामध्ये ६.१ इंचाचा आणि ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. A16 चिपसेटचा सपोर्ट, यूएसबी टाइप सी पोर्ट, ६ जीबी रॅम आणि ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो.
काही वेळापूर्वी Apple चे सीईओ टीम कूक यांनी X (पूर्वीचे ट्विटर )वर एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी आता वेळी झाली आहे. लवकरच भेटूयात. असे लिहिले आहे.
Apple च्या फ्लॅगशिप प्रो लाइनअपमध्ये या वर्षी आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या दोन मॉडेल्सचा समावेश असणार आहे. या डिव्हाइसमध्ये टायटॅनियम मिड फ्रेमचा वापर केला जाऊ शकतो. तसेच यामध्ये 17 बायोनिक चिपचा सपोर्ट मिळू शकतो.
आयफोन १५ प्रो मॅक्स वर देखील सर्वांचे लक्ष आकर्षित होऊ शकते. कारण हा पहिला आयफोन असेल ज्यात सॅमसंग गॅलॅक्सी S23 अल्ट्रा प्रमाणे periscopic झूम लेन्स दिली जाण्याची शक्यता आहे. प्रो मॉडेलची किंमत आधीच्या मॉडेल्सपेक्षा १०० डॉलर्सनी अधिक असण्याची शक्यता आहे.
असे म्हटले जात आहे की, Apple च्या फ्लॅगशिप प्रो लाइनअपमध्ये यावर्षी दोन मॉडेल्सचा समावेश होईल. त्यामध्ये आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्सचा समावेश असेल. या डिव्हाइसमध्ये टायटॅनियम मिड-फ्रेमचा वापर केला जाऊ शकतो. तसेच यामध्ये A17 Bionic चा सपोर्ट मिळू शकतो.
या नवीन आयफोन सिरीजबद्दल अशीही एक अफवा समोर येत आहे की, या सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये लाइटनिंग कनेक्टरऐवजी USB-C चार्जिंग पोर्ट दिले जाऊ शकते.
या इव्हेंटमध्ये कंपनीचा मुख्य फोकस हा आयफोनवर असणार आहे. आयफोन १५ या सिरीजमधील टॉप मॉडेल आयफोन १५ प्रो मध्ये टायटॅनियम केसिंग अॅक्शन बटण मिळू शकते. तसेच गेल्या वर्षीच्या मॉडेलपेक्षा त्याची किंमतदेखील जास्त असू शकते.
Wonderlust या इव्हेंटमध्ये कंपनी बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च करणार आहेच. त्याशिवाय Apple वॉचेस देखील लॉन्च करणार आहे.
iPhone 15 Launch updates: आज Apple कंपनी आयफोन १५ सिरीजसह अन्य प्रॉडक्ट्स लॉन्च करणार आहे.