Apple Event 2024 List of products : ॲपल ९ सप्टेंबर २०२४ रोजी “इट्स ग्लोटाइम” या टॅगलाइनसह लाँच इव्हेंटचे ( Apple Event) आयोजन करणार आहे. आयफोन १६ (iPhone 16) सीरिज, ॲपल वॉच एक्स (Apple Watch X) , ॲपल वॉच अल्ट्रा ३ (Apple Watch Ultra 3) , एअरपॉड्स जनरेशन ४ (AirPods Generation 4) आणि इतर अनेक उपकरणे या कार्यक्रमात लाँच करण्यात येतील, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. पण, लीक झालेल्या माहितीप्रमाणे काही उत्पादने या कार्यक्रमात जाहीर होणार नाहीत. ते प्रोडक्ट कोणते आहेत? मग ते कधी लाँच होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेऊ…

तर कोणते प्रोडक्ट Apple Event मध्ये लाँच होणार नाहीत याची यादी पाहू…

आयफोन एसई ४ (iPhone SE 4) : आयफोन SE 4, २०२५ च्या सुरुवातीला लाँच केला जाईल अशी अपेक्षा आहे. स्मार्टफोन डायनॅमिक आयलंड, ॲक्शन बटण, ॲपल इंटेलिजेंस फीचर, ४८ एमपी कॅमेरा आणि बऱ्याच काही अपग्रेडसह येणार आहेत.

Orange Peel Theory What is the Orange Peel Theory Why is this theory trending in 2024
Orange Peel Theory : ऑरेंज पील थेअरी काय आहे? २०२४मध्ये का ट्रेंड होत आहे ही थेअरी?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
tuberculosis in Mumbai, eradicate tuberculosis,
क्षयरोग निर्मूलनसाठी मुंबईमध्ये राबविणार ‘१०० दिवस मोहीम’, २६ प्रभागांमध्ये ७ डिसेंबरपासून मोहीम सुरू होणार
Vishal Mega Mart IPO
Vishal Mega Mart IPO Date : तुफान कमाई करून देणार ८,००० कोटींचा हा आयपीओ; पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती….
Mata Lakshmi's Blessings
२०२५ मध्ये या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा! माता लक्ष्मीच्या कृपेमुळे सुटतील आर्थिक समस्या
Dr Babasaheb Death Anniversary 2024
महामानवाला अभिवादन, दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटला!

मॅकबुक विथ एम ४ चिपसेट (MacBook with M4 chipset) : ॲपल एम ४ चिपसेटसह नवीन जनरेशनच्या मॅकबुकवर काम करत आहे. नवीन चिपसेट एसएमसीच्या दुसऱ्या पिढीच्या ३ एनएम तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामुळे तो अधिक चांगला परर्फोमन्स देईल. MacBook लाँच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे, ती म्हणजे हे नोव्हेंबर २०२५ मध्ये लाँच होणार असे हायलाइट केले आहे, त्यामुळे ही उत्पादने ९ सप्टेंबरच्या कार्यक्रमात लाँच ( Apple Event) होणार नाहीत.

हेही वाचा…Aadhaar Card Update : आधार कार्डमधील कोणती माहिती घरबसल्या करता येते अपडेट? ‘ही’ पाहा लिस्ट अन् मोफत करा ‘या’ तारखेपूर्वी आधार कार्ड अपडेट

एअरपॉड्स प्रो ३ (AirPods Pro 3) : ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनने अहवाल दिला की, ॲपल फीचर्ससह नवीन एअरपॉड्स प्रो पुन्हा डिझाइन करू शकते. एअरपॉड्स ऑडिओ क्वालिटी, ॲडव्हान्स ANC, नवीन वेगवान चिपसेट ऑफर करतील. ॲपल हेल्थ सेन्सर्स इंटिग्रेट करेल; जे युजर्सच्या शरीराच्या तापमानाचे विश्लेषण करू शकते.

न्यू-जनरल ॲपल टीव्ही (New-gen Apple TV) : ॲपल २०२४ च्या अखेरीस नवीन जनरेशन ॲपल टीव्ही लाँच करेल अशी अपेक्षा आहे. टीव्ही ॲडव्हॉन्स फीचर्ससह येईल, त्यामुळे त्याची परवडणाऱ्या कॅटेगिरीच्या प्रोडक्टमध्ये घोषणा होणार नाही, असे सांगितले जात आहे.

होम पॅड मिनी २ (HomePod mini 2) : ॲपल गेल्या काही काळापासून सेकेंड जनरेशन होम पॅड मिनीवर काम करत आहे. हे प्रोडक्ट जरी ९ सप्टेंबरला लाँच होणार नसले तरीही हा नवीन होम पॅड एस-सीरिज (S-Series) चिपसेट, ॲपल इंटिलिजेंस (Apple Intelligence) सह लाँच होईल आणि Amazon Echo उपकरणांशी स्पर्धा करेल, जे Claude AI द्वारे वापरले जातात.

तर ही पाच Apple उपकरणे आहेत, जी या वर्षी सप्टेंबरनंतर किंवा २०२५ च्या सुरुवातीस पदार्पण करतील अशी अपेक्षा आहे. पण, ते ९ सप्टेंबरला ॲपलच्या कार्यक्रमात ( Apple Event) लाँच होणार नाहीत…

Story img Loader