अ‍ॅपलने आपल्या आगामी फेस्टिवल सेलची घोषणा केली आहे. कंपनीने या अधिकृत टिझर लॉन्च केला आहे. हा फेस्टिवल सेल १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. कंपनीने फटाक्यांपासून तयार केलेला लोगो देखील शेअर केला आहे. ”आमचा फेस्टिवल सेल १५ ऑक्टोबरपासून सुरु होईल. बचत करण्यासाठी तयार राहावे” असे कंपनीने आपल्या टीझरमध्ये सांगितले. अ‍ॅपलने आपले स्टोअर खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम का आहे यावर देखील प्रकाश टाकला. मॅक, एअरपॉड्स, अ‍ॅपल पेन्सिल आणि आयपॅड आणि इमोजीसह कस्टमाइज करणे आणि या सणासुदीच्या काळामध्ये योग्य प्रॉडक्ट्स निवडण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे यांसारख्या अनेक विशेष फीचर्सवर कंपनी काम करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर का तुमच्याकडे जुना फोन असेल आणि तो फोन तुम्ही एक्सचेंज करू इच्छित असाल तर कंपनीकडे एक ट्रेंड इन प्रोग्रॅम देखील आहे. जो अँड्रॉइड आणि iOS हे दोन्ही डिव्हाइस स्वीकारतो. जर का तुम्ही जुने अँड्रॉइड डिव्हाइस एक्सचेंज केल्यास कंपनी ३७ हजारांपर्यंत क्रेडिट ऑफर करते. मात्र कंपनी जे क्रेडिट ऑफर करते ते तुमच्या जुन्या फोनचे मॉडेल आणि त्याची स्थिती यावर अवलंबून असणार आहे. कंपनीचा हा फेस्टिवल सेल देखील काही मर्यादित प्रॉडक्ट्सपुरताच मर्यादित असणार आहे. याबाबतचे वृत्त The Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : iPhone 15 वर मिळतोय ४० हजारांपेक्षा जास्तीचा डिस्काउंट; कुठे सुरू आहे बेस्ट डील? एकदा पाहाच

कंपनी जुन्या आयफोन्स मॉडेलवर ६७,८०० रुपयांची क्रेडिट ऑफर देत आहे. जुन्या आयफोन ७ साठी एक्सचेंज ऑफर केवळ ६ ,०८० रुपयांपर्यंत मर्यादित आहे. Apple आपल्या अपकमिंग सेलशिवाय , Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये देखील आपल्या आयफोन मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. म्हणजेच १२८ जीबी स्टोरेज असणारा आयफोन १४ सध्या फ्लिपकार्टवर ५६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच आयफोन SE थर्ड जनरेशन केवळ ३६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Amazon वर आयफोन १३ हा फोन ४९,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple festival season sale started 15 october tease logo and amazing discounts on limited products tmb 01