अॅपल ही दिग्गज टेक कंपनी आहे. १५ ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून फेस्टिवल सेल सुरु झाला आहे. कंपनीने एक ते दोन दिवसांपूर्वी या सेलचा टिझर लॉन्च केला होता. या सेलसाठी कंपनीने फटाक्यांपासून एक लोगो तयार केला आहे. आपल्या टीझरमध्ये कंपनीने ”आमचा फेस्टिवल सेल १५ ऑक्टोबरपासून सुरु होईल. बचत करण्यासाठी तयार राहावे” असे सांगितले होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुरु झालेल्या या सेलमध्ये आयफोन्स, आयपॅड्स, मॅकबुक , आयपॉड्स आणि अन्य प्रॉडक्ट्सचा समावेश आहे.
अधिकृत वेबसाइटनुसार, आयफोन, एअरपॉड्स आणि होमपॅडसह ६ महिन्यांपर्यंत Apple म्युझिक मोफत मिळणार आहे. तसेच तुम्हाला एअरपॉड्स, एअरटॅग, अॅपल पेन्सिल (दुसरी जनरेशन) किंवा आयपॅड आणि इमोजीसह कस्टमाइज करणे आणि या सणासुदीच्या काळामध्ये योग्य प्रॉडक्ट्स निवडण्यासाठी ग्राहकांना तज्ज्ञांची मदत देणे यांसारख्या अनेक विशेष फीचर्सवर कंपनी काम करते.
जर का तुमच्याकडे जुना फोन असेल आणि तो फोन तुम्ही एक्सचेंज करू इच्छित असाल तर कंपनीकडे एक ट्रेंड इन प्रोग्रॅम देखील आहे. जो अँड्रॉइड आणि iOS हे दोन्ही डिव्हाइस स्वीकारतो. जर का तुमच्याकडे जुना फोन असेल आणि तो फोन तुम्ही एक्सचेंज करू इच्छित असाल तर कंपनीकडे एक ट्रेंड इन प्रोग्रॅम देखील आहे. जो अँड्रॉइड आणि iOS हे दोन्ही डिव्हाइस स्वीकारतो. जर का तुम्ही जुने अँड्रॉइड डिव्हाइस एक्सचेंज केल्यास कंपनी कंपनी तुम्हाला क्रेडिट ऑफर करणार आहे. मात्र कंपनी जे क्रेडिट ऑफर करते ते तुमच्या जुन्या फोनचे मॉडेल आणि त्याची स्थिती यावर अवलंबून असणार आहे. कंपनीचा हा फेस्टिवल सेल देखील काही मर्यादित प्रॉडक्ट्सपुरताच मर्यादित असणार आहे.
या सेलमध्ये कंपनी जुन्या आयफोन्स मॉडेलवर ६७,८०० रुपयांचा क्रेडिट ऑफर करत आहे. कंपनी आपल्या फेस्टिवल सेल बरोबरच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाइट देखील आपापल्या सेलमध्ये अॅपलसह इतर प्रॉडक्ट्सवर ऑफर देत आहे. ८ तारखेला सुरू झालेला फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आज संपणार आहे. २८ जीबी स्टोरेज असणारा आयफोन १४ सध्या फ्लिपकार्टवर ५६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच आयफोन SE थर्ड जनरेशन केवळ ३६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.