ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या एका सुनावणीमध्ये अॅपलला २ कोटी डॉलर्सचा दंड ठोठवण्यात आला आहे. नवीन आयफोन विकत घेतल्यानंतर त्याबरोबर चार्जर दिले जात नसल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. फोनबरोबर चार्जर न दिल्याने ग्राहकांना आणखी एक प्रोडक्ट विकत घेण्यास भाग पाडले जात आहे, ही ग्राहकांशी केलेली गैरवर्तणूक असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.
अॅपलला इलेक्ट्रॉनिक वेस्ट वाचवण्यासाठी चार्जरशिवाय आयफोन विकणार असल्याचे याआधी जाहीर केले होते. त्यानुसार ऑक्टोबर २०२० पासून आयफोनबरोबर चार्जर दिला जात नव्हता. पण यामुळे ग्राहकांना पहिले प्रोडक्ट (आयफोन) वापरता यावे यासाठी दुसरे प्रोडक्ट (चार्जर) विकत घ्यावे लागत आहे, असे ब्राझीलचे न्यायाधीश कॅरामुरु अफोंसो फ्रान्सिस्को यांनी याबाबत निर्णय देताना सांगितले.
आणखी वाचा : प्रवासादरम्यान फोनबरोबर ‘या’ गॅजेट्सची भासू शकते गरज; पाहा यादी
न्यायाधीश कॅरामुरु अफोंसो फ्रान्सिस्को यांनी कॅलिफोर्नियाच्या कंपनीला मागच्या दोन वर्षात आयफोन १२ किंवा १३ विकत घेतलेल्या सर्व ग्राहकांना चार्जर देण्याचे आदेश दिले आहेत. तर काही दिवसांपुर्वी युरोपीय संसदेत सर्व स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि कॅमेराबरोबर सिंगल चार्जर असणारे, युएसबी पोर्ट असावे असावे हा नियम मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता अॅपलला फोनचे डिझाईन बदलावे लागणार आहे.