सध्या अनेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्यांचा समावेश आहे. मात्र Apple ने काही काळ कर्मचारी कपात करणे टाळले होते. मात्र अखेर apple ने देखील कर्मचाऱ्यांना कामावरून कामधून टाकण्यास सुरुवात केली आहे. Apple आपल्या Reatil Team मधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. जर असे झाले तर Apple कंपणीमधील ही पहिली कर्मचारी कपात असणार आहे.
ब्लूमबर्ग आणि बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार Google, Amazon, Meta आणि Microsoft सारख्या मोठ्या कंपन्यानी केलेल्या कपातीच्या तुलनेत apple मधील कपात लहान असण्याची अपेक्षा आहे. तरी ही कपात Apple साथी महत्वाची असणार आहे. गूगलने जवळपास १२,००० , Amazon ने २७,००० याशिवाय meta ने २१,००० कर्मचारी आणि मायक्रोसॉफ्टने सुमारे १०,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
आयफोन निर्माता कंपनी अॅपलची ही पहिलीच कर्मचारी कपात असणार आहे. ब्लूमर्गच्या रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा अद्याप झालेली नाही. कंपनीची ग्रोथ आणि इतर कारणांमुळे कंपनी कपात करण्याचा विचार करत आहे. Apple चे जगभरात रिटेल स्टोअर आहेत, जे आयफोनच्या विक्रीसह उत्पादन आणि देखभालसाठी जबाबदार आहे.
अॅपल किती कर्मचाऱ्यांना काढणार याबाबत कोणतीही माहिती नाही. अॅपल कमीत कमी लोकांना काढून टाकेल अशी अपेक्षा आहे. हे पाऊल जगातील सर्वात मौल्यवान कंपनीसाठी एक नवीन पाऊल असेल. सुस्त अर्थव्यवस्था आणि खर्चात झालेली वाढ यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा : Google च्या २५० कर्मचाऱ्यांनी ‘या’ कारणासाठी केले ‘वॉकआऊट’
गेल्या आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत Apple मध्ये १.६४ लाख कमर्चारी काम करत होते. करोना महामारीच्या काळामध्ये Google , Amazon कंपन्यांसारखी मोठ्या प्रमाणात लोकांची भरती केली नाही. ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे ते पुन्हा कंपनीत नोकरीसाठी अर्ज करू शकतात, असे या अहवालात म्हटले आहे. यासोबतच त्यांना ४ महिन्यांचा पगारही दिला जाणार आहे.