Take home iPhone for free and use it freely for 45 days: प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याच्या मनात एक तीव्र इच्छा असते की त्याच्याकडेही अॅपलचा आयफोन असावा. मात्र महाग असल्याने अनेकदा लोक ते घेणे टाळतात. ग्राहकांची ही समस्या सोडवण्यासाठी अॅपलने ‘बाय नाऊ पे लेटर’ ही क्रेडिट योजना आणली आहे. या अंतर्गत ग्राहकांना आयफोन खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जात आहे, जे नंतर सोयीस्करपणे भरता येईल.

‘बाय नाऊ पे लेटर’ स्कीम कशी आहे?

अॅपलच्या या नव्या सेवेच्या मदतीने युजर्स अॅपलचे आयफोन किंवा आयपॅडसारखे उपकरण कोणतेही पैसे न भरता खरेदी करू शकतात. ही योजना अशा ग्राहकांसाठी आहे, ज्यांचे मासिक उत्पन्न कमी आहे. या योजनेमुळे अॅपल उपकरणांची विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा कंपनीला विक्री वाढवण्यासाठी मिळू शकतो.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे

(हे ही वाचा : खुशखबर! नुकताच लाँच झालेला Google Pixel 7 खरेदी करा स्वस्तात, पाहा कुठे मिळतेय शानदार डील )

ही स्कीम कशी चालेल?

सोप्या भाषेत सांगायचे तर ही अॅपलने ऑफर केलेली कर्ज योजना आहे. यामध्ये देखील तुम्हाला हप्त्याने पैसे भरावे लागतील, परंतु या योजनेमध्ये वापरकर्त्यांकडून व्याजासह इतर कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. यामध्ये ग्राहकांना ४ हप्त्यांमध्ये पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल. समजा तुम्ही ६०००० मध्ये iPhone घेतला असेल तर तुम्ही १५००० च्या चार हप्त्यांमध्ये संपूर्ण रक्कम भरू शकता. हे लक्षात ठेवले पाहिजे की, उत्पादन खरेदी केल्यानंतर ६ आठवड्यांनंतर म्हणजेच सुमारे ४५ दिवसांनी तुम्हाला पहिला हप्ता भरावा लागेल.

किती कर्ज मिळेल?

अॅपलच्या मते, ग्राहक या योजनेअंतर्गत ८२,२७१ रुपयांचे कर्ज घेऊ शकतील. यासाठी तुम्हाला Apple Pay द्वारे पैसे द्यावे लागतील. बाय नाऊ पे सेवेचा लाभ कंपनी ऑनलाइन आणि आयफोन आणि आयपॅडच्या मदतीने घेऊ शकते.

(हे ही वाचा : नवीन लॅपटॉप खरेदी करायचाय? मोबाईलच्या बजेटमधील ‘हे’ आहेत बेस्ट लॅपटॉप्स, ऑफिसच्या कामासाठी होईल उपयोग )

काही अटी पूर्ण करणे आवश्यक

अॅपलच्या योजनेचा लाभ फक्त त्या ग्राहकांनाच मिळणार आहे ज्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे. अॅपल यासाठी ग्राहकांचा सिबिल स्कोअर तपासेल. आणि हे सुनिश्चित करेल की ज्या वापरकर्त्याला कर्ज दिले जात आहे तो ते परत करण्यास सक्षम असेल की नाही.

Story img Loader