दिवाळीच्या तोंडावर अॅपलने ग्राहकांना झटका दिला आहे. नुकत्याच लाँच केलेल्या आयपॅड मिनीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. आयपॅड मिनी A15 Bionic चिपसेटसह येतो जो iPhone 13 आणि iPhone 14 ला देखील सामर्थ्यवान करतो. Apple ने २०२२ iPad Pro आणि iPad रिफ्रेश लाँच केल्यानंतर काही दिवसांनी सहाव्या पिढीच्या आयपॅड मिनीची भारतीय किंमत वाढवली असून किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, जी टॉप-एंड आयपॅड मिनीच्या बाबतीत ५,००० रुपयांपर्यंत आहे. भारतात, आयपॅड मिनीच्या वाय-फाय व्हेरिएंटची किंमत आता ४९,९०० रुपये आहे आणि एलटीई व्हेरिएंटची किंमत ६४,९०० रुपये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लॉन्चच्या वेळी, वाय-फाय आणि एलटीई प्रकारांची किंमत अनुक्रमे ४६,९०० आणि ६०,९०० रुपये होती. Apple iPad Mini भारतात गेल्या वर्षी सादर करण्यात आला होता. ६४ जीबी स्टोरेज आणि वाय-फाय साठी ४६,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आयपॅड मिनी लाँच करण्यात आला. त्याच प्रमाणात स्टोरेज असलेला सेल्युलर पर्याय ६०,९०० रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला.

आणखी वाचा : जीओचा दिवाळी धमाका: सर्वात स्वस्त लॅपटॉपची विक्री सुरु!

iPad Mini चे स्पेसिफिकेशन

आयपॅड मिनीमध्ये ८.३ इंचाचा डिस्प्ले आहे. टॅबलेट Apple च्या A15 बायोनिक चिपसेटच्या समर्थनासह येईल. हाच चिपसेट iPhone 13 आणि iPhone 14 मध्ये वापरण्यात आला आहे. टॅबलेटमध्ये सिंगल १२ एमपी वाइड अँगल कॅमेरा आहे. तर, समोर १२ एमपी सेन्सर सपोर्ट उपलब्ध आहे. आयपॅड मिनीमध्ये टाइप-सी पोर्ट आहे. टॅबलेटमध्ये टच आयडी, 5जी, दुसरी पिढी ऍपल पेन्सिल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. आयपॅड मिनी स्पेस ग्रे, पिंक आणि स्टारलाईट कलर व्हेरियंटमध्ये Apple वेबसाइटवरून खरेदी करता येईल.

किंमत

Apple भारतात आयपॅड मिनीचे २५६ जीबी प्रकार विकते. कंपनीने त्याची किंमतही वाढवली आहे. त्याच्या वाय-फाय व्हेरियंटची किंमत ६०,९०० रुपयांवरून ६४,९०० झाली आहे, तर इतर एलटीई प्रकारांची किंमत आता ७४,९०० रुपयांऐवजी ७९,९०० रुपयांवर गेली आहे. आयपॅड मिनी अॅपलच्या वेबसाइटवर येसस्पेस ग्रे, पिंक, पर्पल आणि स्टारलाइटमध्ये उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple has increased the price of ipad mini pdb
Show comments