Apple is hosting UniDAYS sale in India : ॲपलने (Apple) भारतात विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी काही दिवसांसाठी ॲपल Unidays ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरच्या अंतर्गत मॅक, आयपॅड मॉडेल्सच्या खरेदीवर मोफत एअरपॉड्स किंवा ॲपल पेन्सिल देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त ॲपल केअर प्लस (AppleCare+) योजनांवर २० टक्के सूट दिली जाणार आहे; जी ॲपल एज्युकेशन स्टोअरद्वारे ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

कसा मिळू शकतो या ऑफरचा फायदा ?

१. या ऑफरसाठी पात्र विद्यार्थी, कर्मचारी ८९,९०० रुपयांपासून सवलतीच्या दरात MacBook Air खरेदी करू शकतात; ज्यामध्ये लायटनिंग चार्जिंग केससह एअरपॉड्स ४ (AirPods 4) सुद्धा दिले जातील.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…

२. तसेच ग्राहक ५४,९०० च्या सुरुवातीच्या किमतीत आयपॅड एअर खरेदी करू शकतात आणि त्याचबरोबर त्यांना एक विनामूल्य ॲपल पेन्सिलसुद्धा मिळू शकते.

३. अधिक प्रीमियम फ्लॅगशिप उपकरणांसाठीही ॲपल सूट देत आहे. उदाहरणार्थ- मॅकबुक प्रो (MacBook Pro) १,५८,९०० रुपये या सुरुवातीच्या किमतीत, तर आयपॅड प्रो ८९,९०० रुपयांपासून या सेलमध्ये दिला जाणार आहे. दोघांमध्येही एअरपॉड्स किंवा ॲपल पेन्सिलचा समावेश असणार आहे. त्याव्यतिरिक्त मॅक मिनी, आयमॅक iMac ऑफर्ससह विनामूल्य एअरपॉड्स दिले जातील.

तर या सेलमध्ये ॲपलची कोणती उपकरणे सवलतीसह उपलब्ध आहेत त्याची यादी खालीलप्रमाणे :

एम२ सह मॅकबुक एअर
एम३ सह मॅकबुक एअर
एम३ सह मॅकबुक प्रो 14-इंच
एम३ सह मॅकबुक प्रो 16-इंच
एम३ सह iMac

हेही वाचा…Amazon Great Indian Festival 2024: लॅपटॉपवर ४० टक्के, तर ‘या’ स्मार्टफोन्सवर भरघोस सूट; वाचा ‘ही’ यादी; पाच दिवसात सुरु होणार सेल

एम२ सह मॅक मिनी
आयपॅड प्रो १३-इंच iPad Pro 13-इंच (एम४)
आयपॅड प्रो ११-इंच (एम४)
आयपॅड प्रो १३-इंच (एम२)
आयपॅड प्रो ११-इंच (एम२)

ॲपल केअर प्लससह करा अतिरिक्त बचत :

मोफत एअरपॉड्स किंवा ॲपल पेन्सिलव्यतिरिक्त ॲपल या मॅक किंवा आयपॅड खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲपल केअर प्लस योजनांवर २० टक्के सूट देत आहे. या योजना अपघाती नुकसानीपासून संरक्षणाचीही ऑफर देतात. त्याव्यतिरिक्त ॲपल, ॲपल म्युझिक स्टुडंट प्लॅनसाठी एक विशेष डीलचीही ऑफर देण्यात येत आहे. त्यामध्ये ॲपल टीव्ही प्लसवर विनामूल्य प्रवेशदेखील दिला जाणार आहे.

ॲपल Unidays ऑफरचा लाभ कसा घ्यावा?

ॲपल Unidays ऑफर केवळ विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्था आयडी असलेल्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या विद्यार्थी किंवा कर्मचाऱ्यांचा स्टेट्स थर्ड पार्टी सर्व्हिसद्वारे व्हेरिफाय करणे आवश्यक आहे. व्हेरिफाय प्रक्रिया ग्राहकांना Unidays वेबसाइटवर रिडायरेक्ट करील; जिथे ते त्यांची खरेदी करू शकतील. तसेच ही ऑफर केवळ ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत लागू असणार आहे.

  • सगळ्यात पहिला https://www.myunidays.com/IN/en-IN/partners/apple/view या वेबसाईटवर जा.
  • येथे तुमचा विद्यार्थी क्रमांक (स्टुडंट आयडी) टाकून तुम्ही विद्यार्थी असल्याची खात्री करा.
  • पुढे, ऑन-स्क्रीन सूचनांचे अनुसरण करा आणि आवश्यकतेनुसार माहिती तेथे भरा.

Story img Loader