अॅपल आपल्या ग्राहकांसाठी नवीन नवीन अपडेट्स जारी करतच असते. नुकतंच अॅपलने आयओएस १५.४ अपडेटनंतर सर्व आयफोन युजर्ससाठी ‘प्रेग्नेंट मॅन’, ‘प्रेग्नेंट पर्सन’ आणि इतर अनेक जेंडर-न्यूट्रल इमोजी जारी केले आहेत. ३५ नवीन इमोटिकॉनमध्ये राजा आणि राणीसोबत जाण्यासाठी जेंडर न्यूट्रल ‘मुकुट असलेली व्यक्ती’ इमोजी देखील समाविष्ट करण्यात आले आहे.
परंतु हा बदल अनेक आयफोन युजर्सच्या पचनी पडलेला दिसत नाही आहे. अनेक आयफोन युजर्स या इमोजीमुळे नाखूष आहेत. काही लोकांनी या बदलांवर अनेक विनोदही केले आहेत. अॅपल लठ्ठ माणसाची चेष्टा करत आहे की काय अशी काहींनी खिल्ली उडवली. इंटरनेट युजर्सनी यावर कसा प्रतिसाद दिला ते पाहूया.
विमानात अचानक रडू लागली फ्लाइट अटेंडंट; Viral Video पाहून तुम्हीही व्हाल भावुक
बुलडोजरचा रंग पिवळाच का असतो, माहित आहे का? यामागे आहे ‘हे’ रंजक कारण
ऑक्टोबर २०१९ मध्ये अॅपलने आपल्या सिस्टिममध्ये जवळपास सर्वच मानवी इमोजीसाठी जेंडर न्यूट्रल पर्यायासह आपल्या इमोजींना अधिक चांगले बनवण्यासाठी एक पाऊल उचलले. अनेक नवीन इमोजी सर्वसमावेशकतेवर केंद्रित आहेत. कर्णबधिर आणि दृष्टिहीन लोकांसाठी चिन्हे आहेत आणि इमोजीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेच्या रंगातून निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.