Apple iPad Air launched In India : अॅपल या कंपनीचा फोन किंवा आयपॅड अशी गॅजेट्स विकत घेण्याचे स्वप्न आपल्यातील अनेक जण पाहत असतात. पण, बजेटमध्ये न बसणाऱ्या या कंपनीच्या वस्तू विकत घेणे म्हणजे आपल्यासाठी थोडे कठीणच जाते. पण, तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला अगदी ६० हजारांपर्यंत आयपॅड खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे एक सुवर्णसंधी चालून आली आहे.
ॲपलने एम ३ चिपसेटसह नवीन आयपॅड एअर (iPad Air) लाँच केला आहे. आयपॅड एअर ॲपल इंटेलिजेंसला सपोर्ट करतो आहे. एम ३ चिपसेटसह iPad Air मध्ये पहिल्यांदाच Apple च्या ॲडव्हान्स ग्राफिक्स आर्किटेक्चर, नवीन मॅजिक कीबोर्डचादेखील समावेश असणार आहे. तर तुम्हाला हा आयपॅड एअर ११ आणि १३ इंच अशा दोन स्क्रिनमध्ये उपलब्ध असणार आहे.
किंमत –
आयपॅड एअर (iPad Air) एम ३ सह ११ व १३ इंच स्क्रिन आणि १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी, तर 1TB कॉन्फिगरेशनसह ब्ल्यू, पर्पल, स्टारलाइट, स्पेस ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
१. ११ इंचाच्या वाय-फाय मॉडेलची किंमत ५९ हजार ९०० रुपये.
२. वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेलची किंमत ७४ हजार ९०० रुपये.
३. १३ इंचाच्या आयपॅड एअरची किंमत वाय फाय मॉडेलसाठी ७९ हजार ९०० रुपये.
४. वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेलची किंमत ९४ हजार ९०० रुपये आहे.
पांढऱ्या रंगात उपलब्ध असलेला नवीन मॅजिक कीबोर्डची किंमत…
१. ११ इंचाच्या आयपॅड एअरचा मॅजिक कीबोर्ड २६ हजार ९०० रुपये.
२. १३ इंचाच्या आयपॅड एअरचा मॅजिक कीबोर्ड २९ हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे.
तसेच शिक्षणासाठी (Education)
१. ११ इंचाच्या आयपॅड एअरचा मॅजिक कीबोर्ड २४ हजार ९०० रुपयांना
२. १३ इंचाचा मॅजिक कीबोर्ड २७ हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे.
फीचर्स :
पॉवरफुल एम ३ चिपमध्ये आधीच्या एम १ चिपच्या तुलनेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. अधिक पॉवरफुल 8 core CPU फीचर्स, मल्टीथ्रेडेड CPU वर्कफ्लोसाठी ३५ टक्के जलद, ४० टक्के जलद ग्राफिक्स परफॉर्मन्ससह 9-कोर GPU आहे. हार्डवेअर-ऍक्सिलरेटेड मेश शेडिंग, रे ट्रेसिंगसह, डायनॅमिक कॅशिंग आणि ॲडव्हान्स ग्राफिक्स आर्किटेक्चर पहिल्यांदाच आयपॅड एअरमध्ये देण्यात आले आहे. ग्राफिक्स इंटेन्सिव्ह रेंडरिंग वर्कफ्लोसाठी, M3 सह 4x जलद कार्य करेल, चांगली लायटिंग, रिफ्लेक्शन, शॅडो आणि गेमिंग अनुभव खास करणार आहे.
एम १ चिपच्या तुलनेत, एम ३ चिपमधील न्यूरल इंजिन एआय आधारित वर्कलोडसाठी ६० टक्क्यांपर्यंत वेगवान असणार आहे, तर ११ व १३ इंच स्क्रिनचा पर्याय, नवीन मॅजिक कीबोर्ड, ॲपल पेन्सिल प्रोसह ॲडव्हान्स ॲक्सेसरीजसाठी सपोर्टसह स्वस्तात मस्त आयपॅड खरेदी करण्याची तुमच्याकडे संधी चालून आली आहे.