नवीन वर्षात प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल सुरु आहे. यामध्ये अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट मिळत आहे. हा सेल आज संपणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना Apple iPhone 12 Mini हा मोठ्या सवलतीमध्ये खरेदी करता येणार आहे. Apple iPhone 12 Mini हा Apple च्या पोर्टफोलिओमधला पहिला मिनी स्मार्टफोन आहे.
हा स्मार्टफोन पूर्वीच्या आयफोन सिरीजमधला असला तरी देखील त्याचा आकार आणि वापरायला सोपा असल्यामुळे अजूनही युजर्स त्या फोनची खरेदी करताना दिसतात. कंपनीने २०२० मध्ये ६९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला होता. हा फोन कंपनीने सुरुवातीला ६९,९०० रुपयांना लाँच केला होता.
हेही वाचा : iPhone SE 4 ही सिरीज रद्द होण्याची शक्यता
आयफोन १२ मिनी या फोन सध्या फ्लिपकार्टवर २०,९०१ रुपयांची सूट मिळाल्यानंतर ग्राहकांना ३८,९९९ रुपयांना मिळत आहे. तसेच आयसीआयसीआय आणि सिटी बँकेचे क्रेडिट कार्डवर व्यवहार केल्यास १००० रुपयांची अधिक सूट मिळत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन तुम्ही २४,४८० रुपयांना मिळणार आहे. सर्व ऑफर्स आणि बँकेच्या कार्डवरून व्यवहार केल्यास फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा फोन १३,५१९ रुपयांना मिळणार आहे. एका फोनमध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले येतो. तसेच हा फोनमध्ये A14 बायोनिक चिप येते. तसेच यामध्ये १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप येतो.