भारतीय बाजारपेठेत मोबाईलची मागणी वाढल्याने देशी विदेशी सर्व कंपन्यांमध्ये ग्राहकांना अद्ययावत तंत्रज्ञानासह मोबाईल उपलब्ध करून देण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, या सर्वात अ‍ॅपलसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात २०२२ वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत प्रिमियम सेगमेंट स्मार्टफोन विक्रीमध्ये पहिले स्थान अ‍ॅपल आयफोनने पटकवले आहे. आयफोन १३ बेस्ट सेलिंग स्मार्टफोन ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काउंटरपॉइंटच्या अहवालानुसार, तिसऱ्या तिमाहीत (जुले – सप्टेंबर) भारतात एकूण स्मार्टफोन पुरवठ्यामध्ये आयफोन १३ शीर्षस्थानी आहे. अ‍ॅपलचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा ५ टक्के असून हे आतापर्यंतचे सर्वोच्च असल्याचे अहवालातून समोर आले आहे. दुसरीकडे प्रिमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये कंपनीचा हिस्सा ४० टक्के आहे.

(व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप, व्हिडिओ कॉलवरील सदस्य संख्या वाढवली, समान रुची असणाऱ्यांसाठी लाँच केले कम्युनिटी फीचर)

काउंटरपॉइंटनुसार, अ‍ॅपलला हे यश अशा वेळी मिळाले आहे जेव्हा भारतातील एकूण स्मार्टफोन शिपमेंटमध्ये (वर्ष दर वर्ष) ११ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीतील महागाई आणि या वर्षातील तिसऱ्या तिमाहीत एन्ट्री लेव्हल आणि बजेट सेगमेंटमध्ये ग्राहकांची घसरलेली मागणी याला कारणीभूत असू शकते, असे अहवालात सांगण्यात आले आहे.

डेटानुसार, चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने तिसऱ्या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन बाजाराचे नेतृत्व केले होते. मात्र एन्ट्री लेव्हल सेगमेंटमध्ये कमी मागणीमुळे कंपनीचा पुरवठा १९ टक्के (वर्ष दर वर्ष) घटला. मात्र, २० हजार रुपये मुल्य श्रेणीतील ५ जी स्मार्टफोन विक्रीमध्ये तिसऱ्या तिमाहीत शाओमी पहिल्या स्थानावर आहे, असे अहवालातून सांगण्यात आले आहे.

(आक्षेपार्ह कमेंट्सपासून त्रासले? इन्स्टाग्रामवर सुरू करा ‘हे’ फीचर)

तिसऱ्या तिमाहीत फोन पुरवठ्यात अ‍ॅपलनंतर दुसऱ्या स्थानावर सॅमसंग आणि तिसऱ्या स्थानावर विवो आहे. मात्र शीर्ष पाच कंपन्यांमध्ये सॅमसंगनेच वार्षिक वाढ नोंदवली आहे. बाजारात सॅमसंगचा वाटा १८ टक्के आहे. आकर्षक जाहिरात आणि ऑफर्समुळे ही वृद्धी झाली असल्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

सप्टेंबर २०२२ मध्येही सॅमसंग हे टॉप स्मार्टफोन ब्रांड होते. १० आणि २० हजार श्रेणीतील फोन, गॅलक्सी एम सिरीज आणि एफ सिरीज त्यावेळी खरेदीसाठी उपलब्ध होते. तर, २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीत (वर्ष दर वर्ष) वन प्लसने ३५ टक्क्यांची वृद्धी नोंदवली आहे. कंपनीच्या वृद्धीत नॉर्ड सीई २ सिरीज आणि नॉर्ड २ टीचा मोठा वाटा आहे. प्रिमियम सेगमेंटमध्ये (३० हजार रुपयांवरील फोन) कंपनी तिसऱ्या स्थानावर राहिली.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple iphone 13 top selling iphone in premium segment ssb