अ‍ॅपल कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. त्यामध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. २२ तारखेपासून आयफोन १५ ची विक्री सुरु झाली आहे. आयफोन १४ खरेदी करू इच्छित असणारे खरेदीदार फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलची वाट बघत आहेत. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल त्या स्मार्टफोन खरेदी करण्याऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे जे मागील वर्षीचे फ्लॅगशिप आयफोन मॉडेल खरेदी करू इच्छित आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आयफोन १२ आणि आयफोन १३ ला फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावेळेस आयफोन १४ देखील अविश्वसनीय किंमतीत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलपूर्वी आयफोन १४ या प्लॅटफॉर्मवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदार आयफोन १४ ला फ्लिपकार्टवर ३५,५०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर केवळ ३४,३९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. iPhone 14 ने फ्लिपकार्ट आणि Amazon विक्रीमध्ये सूट मिळाल्यानंतर खरेदीदारांचे लक्ष वेधून घेतले. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

Devadoot Nidhi activity helps friends financially by encouraging mutual participation and support in times of need
सामाजिक भान देणारा ‘देवदूत निधी’
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
Loan App Harassment
Loan App Scam: दोन हजारांच्या कर्जासाठी पत्नीचे फोटो मॉर्फ करत व्हायरल केले, लोन App च्या छळवणुकीला कंटाळून पतीची आत्महत्या
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Prime Minister announces free elections in Syria
Syria : सीरिया बंडखोरांच्या ताब्यात! ७५ भारतीयांचं यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?

हेही वाचा : Amazon Great Indian Festival Sale: १० ऑक्टोबरपासून सुरू होणार सेल; ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार आकर्षक ऑफर्स, VIDEO पाहाच

मागील वर्षी आयफोन १४ , आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्लस सह ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. आयफोन १४ च्या २५६ जीबी स्टोरेज आणि ५१२ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत आता अनुक्रमे ७९,९०० रुपये आणि ९९,९०० रुपये इतकी आहे. आयफोन १४ सध्या ४,९०१ रुपयांच्या डिस्काउंटसह ६४,९९९९ रुपयांमध्ये सूचिबद्ध करण्यात आला आहे. याशिवाय फ्लिपकार्ट आपल्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ३०,६०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. म्हणजेच सर्व बँक ऑफर्स आणि डिस्काउंटनंतर आयफोन १४ फ्लिपकार्टवर केवळ ३४,३९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना ३५,५०१ रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

आयफोन १४ सिरीज ही मागील वर्षी लॉन्च करण्यात आलेली सिरीज आहे. आयफोन १४ मध्ये असलेला चिपसेटचा सपोर्ट हा आयफोन १३ मध्ये असलेल्या चिपसेटसारखाच आहे. आयफोन १४ मध्ये आयफोन १३ प्रमाणेच ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले वापरकर्त्यांसाठी देण्यात आला आहे. ज्यामध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागील बाजूस १२ मेगापिक्सलच्या सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Story img Loader