iPhone 14 हे अॅपल कंपनीद्वारे तयार करण्यात आलेले सध्याचे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. या सीरिजमध्ये Apple आयफोन 14 Plus, Apple आयफोन 14 Pro and Apple आयफोन 14 Pro Max यांचा समावेश होतो. अॅपल कंपनी त्यांच्या पुढील फ्लॅगशिप लाइनअपवर काम करत आहे. iPhone 14 आणि iPhone 13 यांमध्ये खूप समानता आहेत. पण iPhone 14 सिरिज अधिक प्रभावी आहे. यात चिपसेटसह कोरदेखील आहे. शिवाय नॉचसह समोरच्या बाजूला ६.१ इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. या आयफोनमध्ये १२ MP सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी १२ MP कॅमेरा आहे. किंमतीमध्ये बदल झाल्याने Apple iPhone 14 च्या विक्रीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रक्षाबंधन निमित्त फ्लिपकार्टवर आयफोन १४ सवलतीच्या दरात मिळत आहे. तर आयफोन १४ वर कोणकोणत्या ऑफर फ्लिपकार्टवर सुरू आहेत ते जाणून घेऊयात.
आयफोन १४ हा पुढील महिन्यात आयफोन १५ सिरीजसह पुन्हा लॉन्च केला जाण्याची अपेक्षा आहे. तथापि, ते यापुढे Apple चे फ्लॅगशिप असणार नाही. रिलॉन्चिंगबद्दलची माहिती खरी असल्यास आयफोन १४ मध्ये यूएसबी-सी मिळेल. तसेच आयफोन १५ लॉन्च झाल्यानंतर आयफोन १४ च्या किंमतीमध्ये कपात होईल. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
हेही वाचा : Oppo A78 Vs Realme 11 5G: कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोणता स्मार्टफोन ठरतो बेस्ट? एकदा पाहाच
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आयफोन १४ फ्लिपकार्टवर सेलमध्ये ६४ हजार रुपयांचा मोठा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटमुळे आयफोन १४ आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १४ सध्या कंपनीच्या फ्लॅगशिप सिरीजमधील सर्वात स्वस्त फोन आहे. रक्षाबंधन सणाच्या आधी फ्लिपकार्टवर आयफोन १४ हा ३,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
आयफोन १४ सध्या अधिकृत स्टोअर किंमतीपेक्षा ११,९०१ रुपयांच्या डिस्काउंटसह ६७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय खरेदीदार HDFC बँक डेबिट कार्ड EMI आणि क्रेडिट कारच्या व्यवहारांवर ४ हजार रुपयांची सूट मिळवू शकतात. यामुळे फोनची किंमत कमी होऊन ६३,९९९ रुपये इतकी झाली आहे. याशिवाय फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ६० हजार ररुपयांचा डिस्काउंट देत आहे. याचाच अर्थ सर्व बँक ऑफर्स आणि डिस्काउंटनंतर आयफोन १४ फ्लिपकार्टवर ६४ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर ३,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.