Apple iphone 14 emergency sos feature : अलीकडेच अ‍ॅपल आयफोनच्या क्रॅश डिटेक्शन फीचरने अपघात झालेल्या महिलेची मदत केल्याचे समोर आले होते. आता पुन्हा आयफोनमुळे दोन लोकांचा जीव वाचल्याचे समोर आले आहे.

मॅकरुमर्सनुसार, अ‍ॅपलच्या एका फीचरने कॅलिफोर्नियामध्ये खोल दरीत पडलेल्या दोन लोकांचे प्राण वाचवले आहेत. ही घटना कॅलिफोर्नियातील अँजेलेस नॅशनल फॉरेस्टमधील अँजेलेस फॉरेस्ट हायवेवर घडली. वाहन दरीत सुमारे ३०० फूट खोल अंतरावर कोसळल्यानंतर लवकरच आयफोन १४ स्मार्टफोनला क्रॅश झाल्याचे कळताच त्याने सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीद्वारे बचावकर्त्यांना आपत्कालीन एसओएस पाठवले.

marine heat waves
समुद्राखाली २०० मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या सागरी उष्णतेच्या लाटांचा अभ्यास संशोधकांनी का केला?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
antartica secret door
Massive Door In Antartica: अंटार्क्टिकामध्ये सापडलेल्या रहस्यमयी दरवाजामागील सत्य काय?
hamas leader yahya sinwar
विश्लेषण: याह्या सिनवारच्या हत्येनंतर गाझामध्ये युद्धविरामाची शक्यता किती? इस्रायलसाठी मोठा विजय?
diptheria disease punjab death
Diphtheria: देशात ‘घटसर्प’ आजाराच्या प्रकरणांमध्ये वाढ; हा आजार काय आहे? याची लक्षणे अन् उपाय काय?
Postponing possible interest rate cuts due to high inflation print eco news
उच्चांकी उसळलेल्या महागाईमुळे संभाव्य व्याजदर कपात लांबणीवर
what is the pink tax that additional price paid by women
स्त्री ‘वि’श्व : ‘गुलाबी करा’चे गूढ
Chennai Air Force Show
Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू, २३० जणांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

(Instagram account उघडत नाहीये? ‘Hack’तर झाले नाही ना? खाते परत मिळवण्यासाठी तातडीने करा ‘हा’ उपाय)

आयफोन १४ स्मार्टफोनच्या आपात्कालीन एसओएसने अ‍ॅपलच्या रिले सेंटरला सॅटेलाइटच्या माध्यमातून संदेश पाठवला. हा संदेश नंतर एलए काउंट शेरिफला मदतीसाठी पाठवण्यात आला. आपात्कालीन कॉलनंतर मोंट्रोस संशोधन आणि बचाव पथक घटनास्थळी गेले आणि त्यांनी दोन्ही अपघातग्रस्त व्यक्तींना वाचवले. नंतर दोघांनाही उपचारासाठी स्थानिक रुगणालयात दाखल करण्यात आले.

मोंट्रोस संशोधन आणि बचाव पथकाच्या ट्विटनुसार, त्यांना १४ डिसेंबरला अ‍ॅपलकडून आपात्कालीन सॅटेलाइट कॉल आला. ज्याचा उपयोग अपघातग्रस्तांच्या ठिकाणाची माहिती करण्यासाठी करण्यात आला. बचावकार्य कॅमेरामध्ये रेकॉर्ड करण्यात आले.

(Heart fail कधी होणार? या बाबत काही आठवड्यांपूर्वीच कळणार! ‘या’ तंत्रज्ञानाची जगात चर्चा, असे करते काम)

यापूर्वीही संकटात अडकलेल्यांची केली मदत

अॅपलच्या फीचरद्वारे लोकांना अडचणीत असताना मदत झाल्याची ही पहिली घटना नाही. रेड्डिट पोस्टनुसार, अलीकडेच झालेल्या एका अपघातात, iPhone 14 मधील क्रॅश डिटेक्शन फीचरने विवाहीतेचा अपघात झाल्यानंतर ताबडतोब तिच्या पतीला अलर्ट केले. क्रॅश डिटेक्शन फीचरमुळे पतीला अपघाताचे नेमके स्थळ मिळण्यासाठी मदत झाली.

रेड्डिटनुसार, अपघात झाला तेव्हा पती त्याच्या पत्नीसोबत फोनद्वारे संपर्कात होता. मात्र, क्रॅश डिटेक्शन फिचरमुळे त्याला अपघात स्थळी पोहोचण्यात मदत झाली आणि रुग्णवाहिका येण्यापूर्वी तो पत्नीला मदत देऊ शकला.

(Samsung पुन्हा चर्चेत, फ्लिप फोन नसल्याची अ‍ॅपलला करून दिली आठवण, पाहा नवीन जाहिरात)

मी माझ्या पत्नीशी फोनवरून बोलत होतो तेव्हा ती स्टोअरवरून घराकडे येत होती. या दरम्यान मी तिची किंकाळी ऐकली आणि लाइन डेड झाली. त्यानंतर काही सेकंदातच मला माझ्या पत्नीच्या आयफोनवरून एक सूचना मिळाली की, ती क्रॅश झाली आणि तिचे अचूक स्थान मिळाले, असे व्यक्तीने रेड्डिटवर लिहिले आहे.