फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल हा ८ तारखेपासून सुरू झाला आहे. खरेदीदारांना या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स, लॅपटॉप, टॅबलेट आणि अन्य इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर आकर्षक सूट मिळत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन १४ प्लस हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. अॅपल आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यायनंतर या सिरीजमधील मॉडेल्स ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. मात्र या आयफोन १५ पाठोपाठ ग्राहकांचे लक्ष आयफोन १४ प्लस वर देखील केंद्रित झालेले दिसून येत आहे. आयफोन १४ प्लस हा स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च करण्यात आलेला स्मार्टफोन आहे. मात्र सध्या फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये आयफोन १४ प्लस वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. आयफोन १४ प्लसवर कोणकोणत्या ऑफर्स सुरू आहेत आणि हा फोन स्वस्तात कसा खरेदी करता येऊ शकतो याबद्दल जाणून घेऊयात.
आयफोन १४ प्लस : फीचर्स
आयफोन १४ प्लसमध्ये आयफोन १४ प्रमाणेच फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र या फोनमध्ये मोठ्या आकाराचा डिस्प्ले आणि अधिक कार्यक्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. आयफोन १४ प्लस हा स्मार्टफोन ग्राहक ब्ल्यू पर्पल, मिडनाइट, स्टारलाइट आणि लाल या रंगांमध्ये खरेदी करू शकतात. यामध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देखील मिळतो. स्मार्टफोनमध्ये आयफोन १३ प्रो मॉडेलप्रमाणेच A15 बायोनिक चिपचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास खरेदीदारांना यामध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक अल्ट्रा वाइड सेन्सरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आयफोन १४ प्लस हा फोन ५जी फोन आहे. एकदा चार्ज केल्यास हा फोन २६ तास चालू शकतो असा कंपनीचा दावा आहे.
आयफोन १४ प्लसचे बेस मॉडेल भारतात ८९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आले होते. आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यांनतर कंपनीने आयफोन १४ प्लसची किंमत १० हजारांनी कमी केली आहे. त्यामुळे आता या फोनची सुरुवातीची किंमत ७९,९०० रुपये आहे. सध्या आयफोन १४ प्लस स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये केवळ २३,८४९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर फ्लिपकार्टमध्ये ४२,१५० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
आयफोन १४ प्लस वॉर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये १३,९०१ रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यामुळे हा फोन सध्या ६५,९९९ रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध दिसत आहे. याशिवाय खरेदीदारांची आयसीआयसीआय आणि अॅक्सिक्स व सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास त्यांना १ हजारांची अतिरिक्त सूट मिळू शकते. यामुळे आयफोन १४ प्लसची किंमत कमी होऊन ६४,९९९ रुपये इतकी होते. तसेच खरेदीदारांना जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ४१,१५० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. म्हणजेच सर्व ऑफर्स आणि बँक डिस्काउंट पाहिल्यास आयफोन १४ प्लस हा फोन फ्लिपकार्टवरून केवळ २३,८४९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.