Flipkart वर उत्पादनांच्या अनेक श्रेणी आहेत ज्यामधून ग्राहक त्यांचे आवडते उत्पादन निवडू शकतात. या श्रेण्‍यांपैकी आज आम्‍ही तुमच्‍यासाठी एका खास श्रेणीचे धमाकेदार उत्‍पादन घेऊन आलो आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये असली तरी ग्राहक ते काही हजारांत खरेदी करू शकतात. Apple कंपनीने आपल्या नवीन iPhone सिरीजमधील Phone 14 आणि iPhone 14 Plus हे नवीन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहेत. या नवीन बदलामुळे वापरकर्ते आता पाच रंगांमध्ये आयफोन खरेदी करू शकणार आहेत. आयफोन सिरीज १४ च्या या दोन स्मार्टफोन्समध्येच कंपनीने बदल केले आहेत. कंपनीने iPhone 14 आणि iPhone 14 Plus हे दोन्ही स्मार्टफोन्स Yellow रंगामध्ये लॉन्च केले आहेत. 

पिवळ्या रंगामध्ये येणारा iPhone 14 कंपनीच्या वेबसाईटवर मूळ किंमतीमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. पण Flipkart कडून फोनवर प्रचंड डिस्काउंट मिळत आहे. ही सवलत किती काळ टिकेल याबाबत काहीही सांगता येणार नाही. मात्र फोनची किंमत एकत्र केल्यास फोनवर थेट १२,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या फोनची कंपनीच्या वेबसाईटवर असलेली किंमत ७९,००० रुपये आहे. यामध्ये आपण हा फोनवर फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

india e vehicles market estimated annual sales to reach 30 to 40 lakhs
ई-वाहनांची वार्षिक विक्री ३० ते ४० लाखांवर पोहोचण्याचा अंदाज
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
reliance Infra electric cars news
अनिल अंबानींची रिलायन्स ई-वाहनांच्या निर्मितीत उतरणार? २.५ लाख गाड्यांचं प्राथमिक लक्ष्य
cyber fraud of 88 lakh with company manager
मुंबई : कंपनी व्यवस्थापकाची ८८ लाखांची सायबर फसवणूक
fir against 25 including four companies in 35 crore fraud of 214 investors
२१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक; चार कंपन्यासह २५ जणांविरोधात गुन्हा
Jog bridge, mumbai municipal corporation,
मुंबई : …अखेर जोग पुलाची दुरुस्ती होणार, उड्डाणपुलाचा ९५ कोटींचा खर्च पालिका करणार, एमएमआरडीएकडून पैसे वसूल करणार
2024 Hyundai Alcazar
ह्युंदाईने खेळला नवा गेम; बाजारपेठेत दाखल करण्यापूर्वीच ‘या’ ७ सीटर SUV ची बुकींग केली सुरु, किती मोजावे लागणार पैसे?
cyber crime
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांची सायबर फसवणूक

हेही वाचा : Flipkart Big Saving Days Sale: घाई करा! फक्त १,४९९ रुपयांमध्ये Apple ची ‘ही’ वॉच सिरीज खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर

आयफोन १४ यलो वर असा मिळतोय डिस्काउंट

Flipkart वर आयफोन १४ यलो १२८ जीबी स्टोरेज असणारे मॉडेल ७९,९९९ रुपयांऐवजी ७१,९९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. जर का तुम्ही HDFC बँकेच्या कार्डवरून पेमेंट केले तर तुम्हाला ४,००० रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. याचा अर्थ iPhone 14 चा यलो कलर व्हेरिएंट फ्लिपकार्टवर Apple India ई-स्टोअरपेक्षा स्वस्तात उपलब्ध आहे.

आणखी ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास जर का तुमच्याकडे HDFC बँकेचे कार्ड नसेल तरी फ्लिपकार्ट Axis बँकेचे कार्ड वापरणाऱ्या वापरकर्त्यांना ५ टक्क्यांचा डिस्काउंट देत आहे. तसेच एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्ही ३०,००० रुपयांची बचत करू शकता. जर का असे झाले तर या आयफोनची किंमत मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.