Apple ही टेक कंपनी आहे. याचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे. कंपनी आयफोन ,आयफोन स्मार्टफोन, आयपॅड टॅब्लेट कम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअरचे देखील उत्पादन करते. Apple कंपनीचे आयफोन हे लवकरच भारतामध्ये तयार होणार आहेत. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवर असणारी निर्भरता कमी करण्यासाठी भारतात आगामी iPhone 15 सिरीजमधील काही मॉडेल्सचे उत्पादन सुरु करणार आहे. आयफोन १५ सिरिज या वर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात तयार होणार आहेत. यासाठी टाटा ग्रुपने Apple सह करार केला आहे. म्हणजेच टाटा ग्रुपने टेक्नॉलॉजीत मोठे पाऊल टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेड इन इंडिया असणार iPhone 15 आणि iPhone 15 Plus

कंपनी आपल्या आगामी आयफोन सिरीजमधून भारतात बेस व्हेरिएंट फोन iPhone 15 आणि iPhone 15 Plus तयार करण्याची तयारी करत आहे.तैवानच्या मार्केट इंटेलिजन्स असलेल्या ट्रेंडफोर्सच्या वृत्तानुसार, Foxconn, Pegatron आणि Lux Share नंतर Apple साठी iPhones तयार करणारी टाटा समूह ही चौथी कंपनी असेल.

अहवालानुसार, टाटा समूहाकडून आयफोन १५ आणि १५ प्लसचे उत्पादन भारतात करण्याची योजना आखली जात आहे. आयफोनचे उत्पादन भारतात झाले तर चीनला हा मोठा धक्का असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Apple च्या सहसंस्थापकांच्या १४ हजारांच्या चेकचा तब्बल ‘इतक्या’ लाखांमध्ये झाला लिलाव, आकडा पाहून व्हाल थक्क

टाटा ग्रुप तयार करणार आयफोन

टाटा समूहाने विस्ट्रॉनची भारतीय उत्पादन लाइन विकत घेतली आहे. ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे जी आयफोन 15 सिरिज असेंबल करणार आहे. हा दावा अशा वेळी केला जात आहे जेव्हा विस्ट्रॉन भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. तसेच आयफोनचे उत्पादन भारतात झाल्यामुळे त्याची किंमत सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple iphone 15 and 15 plus made in india production with tata group china check details tmb 01