अॅपल कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. या आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन १५ सिरीजची विक्री २२ तारखेपासून सुरु झाली आहे. Apple च्या अनेक चाहत्यांनी आयफोन १५ सिरीजमधील मॉडेल्सची खरेदी केली आहे. मुंबई आणि दिल्लीमधील कंपनीच्या अधिकृत स्टोअर्सबाहेर ग्राहकांनी आदल्या दिवसापासूनच गर्दी केली होती. मात्र अनेकांना महागडे हँडसेट त्यांच्या बजेटमुळे खरेदी करणे शक्य होत नाही. यामुळे ग्राहकांचे लक्ष आयफोन १४, आयफोन १४ प्रो मॅक्स आणि आयफोन १३ सह जुन्या मॉडेल्सकडे वळले आहे. आज आपण जुन्या आयफोन मॉडेल्सच्या किंमती व त्यावरील ऑफर्स जाणून घेउयात.
आयफोन 14
सध्या आयफोन १४ Amazon वरती ६२,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. तुम्हाला या डिव्हाइसवर ३७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
आयफोन 13
आयफोन १३ सध्या फ्लिपकार्टवर ५२,४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला याफोन १३ च्या खरेदीवर ३०,६०० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. आयफोन १३ सध्या Amazon वर उपलब्ध नाही आहे.
आयफोन 14 Pro
आयफोन १४ प्रो Amazon आणि फ्लिपकार्टवर १,१९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. तथापि, Amazon आयफोन १४ प्रो वर ३७,५०० रुपयांचा आणि फ्लिपकार्टवर ३०,५०० रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. जर का तुम्ही एक्सचेंज ऑफरसह आयफोन १४ प्रो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दोन्ही वेबसाइट्सवर तुमच्या जुन्या फोनची किंमत तपासून घ्यावी.
आयफोन १४ प्रो मॅक्स
आयफोन १४ प्रो प्रमाणेच आयफोन १४ प्रो मॅक्स मॉडेल देखील फ्लिपकार्ट आणि Amazon वर एक सारख्याच किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही वेबसाइट्सवर आयफोन १४ प्रो मॅक्स १,२७,९९९ रुपयांच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. मात्र या दोन्ही साइट्सवर वेगवेगळ्या एक्सचेंज बोनस ऑफरमध्ये उपलब्ध असणार आहे. Amazon वर ३७,५०० रुपयांचा बोनस मिळेल तर फ्लिपकार्टवर ३०,५०० रुपयांचा बोनस मिळू मिळेल.
आयफोन १५ सिरीजची भारतातील किंमत
आयफोन १५, आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॉडेल्स सध्या अनुक्रमे ७९,९०० रुपये, ८९,९०० रुपये, १,३४,९०० रुपये आणि १,५९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहेत. अधिकृत Apple स्टोअरवर खरेदीदार आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस मॉडेलवर HDFC बँकेच्या कार्डच्या माध्यमातून ५ हजारांचा झटपट डिस्काउंट मिळवू शकतात. आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेलवर HDFC बँकेच्या कार्डवर ६ हजारांचा झटपट डिस्काउंट उपलब्ध आहे.