काल कंपनीचा Wonderlust इव्हेंट पार पडला.त्यामध्ये Apple ने आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज भारत आणि जागतिक स्तरावर लॉन्च केली आहे. नवीन डिव्हाइसचे प्री बुकिंग हे १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर याची विक्री २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयफोन १५ सिरीजमध्ये कंपनीने बेस मॉडेल्ससह आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स हे दोन मॉडेल देखील लॉन्च केले आहेत. त्यांचे फीचर्स आणि भारतातील किंमत याबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स : फीचर्स

Apple कंपनीने आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये नवीन टायटॅनियम फ्रेम दिली आहे. टायटॅनियम फ्रेम हे इव्हेंटमध्ये देखील हायलाइट करण्यात आले होते. प्रो मॉडेल्स हे कंपनीने तयार केलेले सर्वात हलके आहे. तसेच या मॉडेल्समध्ये नवीन हार्डवेअर अपडेट देखील मिळाले आहे. ते म्हणजे नवीन A17 Pro चिपसेटचा सपोर्ट यात देण्यात आला आहे. A17 Pro चिपसेटमुळे प्रो मॉडेल्स हे अ‍ॅडव्हान्स 3nm आर्किटेक्चरसह लॉन्च होणारे पहिले स्मार्टफोन बनले आहेत. अतिरिक्त कार्ये आणि परफॉर्मन्समध्ये बदल झाला असूनही बॅटरी लाइफ सारखेच असणार आहे.याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह iPhone 15 आणि iPhone 15 प्लस भारतात लॉन्च; किती असणार किंमत?

प्रो मॉडेल्स हे २९ तासांपर्यंत व्हिडीओ प्ले बॅक टाइम देतात असा कंपनीचा दावा आहे. आयफोन १५ प्रो आणि १५ प्रो मॅक्स मॉडेल्सच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामधील कॅमेरा सेन्सर अपग्रेड करण्यात आले आहेत. दोन्ही मॉडेलमध्ये ४८ मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळणार आहे. यामधील सेन्सर हा आयफोन १५ व १५ प्लसमधील सेन्सरपेक्षा मोठा असल्याचा दावा कंपनीचा आहे. आता वापरकर्ते अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा वापर करून मॅक्रो फोटोग्राफी देखील करू शकणार आहेत. प्रो मॅक्स मॉडेल्समध्ये periscope लेन्स मिळते. जी आयफोन १५ प्रो वर 3x आणि iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर 2x च्या तुलनेत 5x ऑप्टिकल झूमसाठी परवानगी देते.

काय असणार भारतातील किंमत ?

आयफोन १५ प्रो च्या १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही १,३४,९०० रुपयांपासून सुरु होते. तर आयफोन १५ प्रो मॅक्सच्या २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,५९,९०० रुपयांपासून सुरु होते. आयफोननं १५ प्रोच्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,३४,९०० रुपये, २५ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत १,४४,९०० रुपये, ५१२ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत १,६४,९०० रुपये आणि १ टीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत १,८४,९०० रुपये आहे. तसेच आयफोन १५ प्रो मॅक्सच्या २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,५९,९०० रुपये, ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,७९,९०० रुपये आणि १ टीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १,९९,९०० रुपये असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple iphone 15 pro and pro max 134900 rs and 159900 rs in india periscope lens check features tmb 01
First published on: 13-09-2023 at 12:45 IST