Apple चा नवीन फोन iPhone 15 ची लोक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत iPhone 15 बद्दल अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अनेक बातम्यांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की , या फोनमध्ये सर्व काही पाहायला मिळणार आहे जे आधीच्या कोणत्याच मॉडेलमध्ये पाहायला मिळाले नाही. यामध्ये नवीन आयफोनमध्ये निश्चित केलेल्या फीचर्सपैकी एक म्हणजे यूएसबी टाईप-सी पोर्ट. Apple सप्टेंबर महिन्यात iPhone 15 बाजारात लॉन्च करू शकते. 9to5Mac ने iPhone 15 संदर्भात एक अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की iPhone 15 Pro टायटॅनियम फ्रेम आणि गोलाकार Edges सह येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कंपनी iPhone 15 Pro मध्ये सेन्सरचा आकार वाढवू शकते, ज्यामुळे कॅमेरा मॉड्यूलची जाडी वाढू शकते. असेही सांगितले जात आहे की नवीन फोनचा कॅमेरा आयफोन 14 च्या तुलनेत दुप्पट मोठा असू शकतो. iPhone 15 मध्ये, ग्राहकांना हॅप्टिक बटणे पाहायला मिळू शकतात.म्हणजेच, तुम्हाला फोनमध्ये फिजिकल बटणे दिसणार नाहीत. तुम्ही टचद्वारे फोनला कमांड देऊ शकाल. नवीन आयफोनच्या डिझाइनबद्दल, लीक्समध्ये असे म्हटले गेले आहे, कंपनी आतापर्यंतच्या सर्वात पातळ बेझल्ससह iPhone 15 Pro Max लॉन्च करेल. यामध्ये तुम्हाला १.५५ मिमीचे बेझल्स पाहायला मिळतील.

हेही वाचा : Lava Mobiles: लॉन्च झाला मेड इन इंडिया Lava Blaze 2 स्मार्टफोन; ११ जीबी रॅम आणि किंमत फक्त…

iPhone 15 Pro या सिरीजमध्ये Deep Red हा रंग दिसू शकतो. याआधी कंपनीने पर्पल, डार्क ब्ल्यू आणि रेड शेड्समध्ये आयफोन लॉन्च केले आहेत. आयफोन १५ च्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलंड हे फिचर उपलब्ध असणार आहे. हे फिचर याआधी फक्त आयफोन प्रो या मॉडेलपुरतेच उपलब्ध होते.

जून महिन्यात होणार Apple चा इव्हेंट

Apple चा WWDC इव्हेंट ५ जूनपासून सुरू होणार असून ९ जूनपर्यंत असणार आहे. या इव्हेंटमध्ये, कंपनी नवीनतम iOS, iPadOS, macOS, watchOS आणि tvOS लॉन्च करू शकते. या इव्हेंटमध्ये कंपनी लोकांमध्ये iPhone 15 संबंधी कोणतेही अपडेट लॉन्च करण्याची शक्यता आहे.