iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे. लवकरच iPhone 15 लॉन्च होणार आहे. Apple या वर्षी सप्टेंबर महिन्यात जागतिक स्तरावर iPhone 15 सिरीज लॉन्च करण्याची शक्यता आहे. एका नवीन रिपोर्ट्सनुसार बहुप्रतीक्षित अशा Apple इव्हेंटची अपेक्षित लॉन्चिंगच्या तारखेबद्दल संकेत दिले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी आयफोन १५ सीरिजच्या किंमती देखील लीक झाल्या होत्या. तर आयफोन १५ सिरीज कधी लॉन्च होणार आणि या रिपोर्टमध्ये काय काय सांगण्यात आले आहे ते जाणून घेऊयात.
9to5Mac च्या रिपोर्टनुसार, Apple या वर्षी १३ सप्टेंबर रोजी आयफोन १५ सिरीजचा लॉन्चिंग इव्हेंट आयोजित करण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षी अँपलने ७ सप्टेंबर रोजी आपल्या ‘Far Out’ इव्हेंटमध्ये आपली iPhone 14 सिरीज लॉन्च केली होती. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
रिपोर्टनुसार, मोबाइल कॅरिअर्सने कर्मचाऱ्यांना १२ सप्टेंबरला एका प्रमुख स्मार्टफोनच्या घोषणेमुळे सुट्टी न घेण्यास सांगितले आहे. कंपनी त्या दिवशी आपला नवीन आयफोन सिरीज लॉन्च करेल असे संकेत मिळत आहेत. हे Apple च्या iPhone लॉन्च इव्हेंटच्या टाइमलाइनच्या अनुषंगाने देखील येते ज्याचे त्याने वर्षानुवर्षे अनुसरण केले आहे.
आयफोन १४ सिरीज भारतात ७ सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात आली होती. त्याची प्री-ऑर्डर ९ सप्टेंबरपासून सुरू झाली होती. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, आयफोन १५ सिरीज १५ सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच एका आठवड्याने म्हणजे २२ सप्टेंबर रोजी हा फोन स्टोअरमध्ये उपलब्ध होऊ शकते.
हेही वाचा : BSNL चे दोन भन्नाट रिचार्ज प्लॅन, रात्री २ ते पहाटे ५ पर्यंत मिळणार ‘हा’ फायदा
अॅपल विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी अलीकडेच संकेत दिले आहेत की, आयफोन १५ ची मागणी ही आयफोन १४ पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. या वेळी आयफोन १५ सिरीजमधील प्रो मॉडेल्सच्या किंमतीमध्ये २०० डॉलर्सची वाढ होण्याची शक्यता आहे. तर बेसिक मॉडेलची किंमत आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस सारखीच राहू शकते.