Apple ही दिग्गज टेक कंपनी आहे. iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे. अ‍ॅपलने मंगळवारी त्यांच्या वार्षिक आयफोन इव्हेंटचे आमंत्रण पाठवले आहे.  कंपनी १२ सप्टेंबर म्हणजे उद्या आपल्या वंडरलस्ट इव्हेंटमध्ये आयफोन १५ ही नवीन सिरीज लॉन्च करणार आहे. प्रत्येक आयफोन इव्हेंटप्रमाणेच या वर्षीच्या इव्हेंटबद्दल देखील अनेक अफवा समोर येत आहे. आयफोन १५ सिरीजमधील अनेक फीचर्स आधीच मोठ्या प्रमाणावर लीक झाले आहेत. मात्र इव्हेंटमध्येच या मॉडेलच्या अधिकृत किंमती कळू शकणार आहेत. आज आपण आयफोन १५ सिरीजमधील फोनच्या किंमती काय असू शकतात त्याबद्दल जाणून घेऊयात.

आयफोन वापरणे हे सर्वांनाच आवडत असते. आयफोन १५ सिरीज उद्या लॉन्च होणार आहे. यामध्ये जुन्या आयफोन्सप्रमाणेच दोन स्टॅंडर्ड आयफोन मॉडेल्स आणि दोन प्रो मॉडेल्स मिळतात जे नॉन प्रो मॉडेलच्या तुलनेत प्रीमियमवर विकले जातील. कंपनी उद्या आयफोन ५, आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स असे चार नवीन मॉडेल्स ऑफर करणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार

हेही वाचा : Apple Event 2023: iPhone 15 सिरीजच्या लॉन्चिंगची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार स्पेशल इव्हेंट

आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लसची अपेक्षित किंमत

कंपनी मागील वर्षीच्या नॉन प्रो मॉडेलची किंमत कायम ठेवू शकते. अमेरिकेमध्ये फोनची किंमत ९९९ $ पासून सुरु झाली होती. भारतीय खरेदिदारांसाठी बेस मॉडेलची किंमत ७९,९०० रुपये ठेवण्यात आली होती. नवीन आयफोन १५ प्लस ची किंमत ८९,९०० रुपये असण्याची शक्यता आहे. आयफोन १५ स्टॅंडर्ड मॉडेल्समध्ये काही महत्वाचे अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे. अपेक्षा आहे की आयफोन १५ मध्ये आयफोन X सिरीजनंतर नॉच पासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या मॉडेलमध्ये प्रथमच सादर केलेल्या डायनॅमिक Island से रिप्लेस तसेच बेजलचा आकार देखील स्प्लिट होण्याची शक्यता आहे. कंपनी प्रायमरी कॅमेऱ्याला १२ मेगापिक्सलपासून ४८ मेगापिक्सलपर्यंत अपग्रेड करेल अशा देखील अफवा उठत आहेत. आयफोन १५ आता A16 बायोनिक चिपसेटच्या सपोर्टसह येऊ शकतो. तसेच नॉन प्रो आणि प्रो या दोन्ही मॉडेल्समध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देखील मिळू शकते.

आयफोन १५ आणि आयफोन १५ प्रो मॅक्सची अपेक्षित किंमत

आयफोनच्या प्रो मॉडेल्समध्ये काही प्रमुख अपडेट मिळणार आहे ज्यामध्ये किंमती वाढू शकतात. आयफोन १५ प्रो च्या किंमतीमध्ये १०० डॉलर्सची वाढ होण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षी आयफोन १४ प्रो ला अमेरिकेमध्ये ९९९ डॉलर्समध्ये लॉन्च करण्यात आला होता. यावर्षी १५ प्रो ची किंमत १०९९ डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. भारतीय ग्राहकांना कदाचित १० हजारांची वाढ होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : जागतिक लॉन्चिंगसह भारतात देखील Apple लॉन्च करणार iPhone 15 सिरीज, काय असणार खास?

आयफोन १५ प्रो मॅक्समध्ये आणखी काही मोठे अपडेट मिळण्याची शक्यता आहे. प्रो मॅक्स मॉडेलची किंमत $२०० ने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लॉन्चची किंमत १,२९९ डॉलर्सवर जाऊ शकते. भारतीय खरेदीदारांना मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या मॉडेलपेक्षा उद्या लॉन्च होणाऱ्या मॉडेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळू शकते. ज्याची किंमत १,३९,९०० रुपयांपासून सुरु झाली होती.

Story img Loader