iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे. लवकरच iPhone 15 लॉन्च होणार आहे. Apple या वर्षी सप्टेंबर महिन्यात जागतिक स्तरावर iPhone 15 सिरीज लॉन्च करण्याची शक्यता आहे. लॉन्चच्या आधी आगामी मॉडेल्सची किंमत ऑनलाईन समोर आली आहे. आयफोन १५ सिरीजमध्ये iPhone 15, iPhone 15 Pro, iPhone 15 Plus आणि iPhone 15 Pro Max चा समावेश असण्याची शक्यता आहे. बार्कलेजचे विशेलषक टीम लॉन्ग यांच्या मते लीक झालेल्या किंमतीनुसार आयफोन १५ आणि आयफोन १५प्लस ची किंमत जनरेशनमधील डिव्हाइसरखीच असेल.

प्रो मॉडेल्ससाठी आयफोन १५ प्रो ची किंमत त्याच्या पूर्वीच्या डिव्हाइसपेक्षा $१०० जास्त असू शकते. त्याचप्रमाणे आयफोन १५ प्रो मॅक्स ची किंमत $२०० ने वाढण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे आयफोन १४ प्रो १,२९,००० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. तर आयफोन १४ प्रो मॅक्स १,३९,००० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
australia Ban on social media use
सोळावं वरीस बंदीचं?…ऑस्ट्रेलियात १६ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना सोशल मीडिया वापरास बंदी! कारणे कोणती?

हेही वाचा : BSNL चे ‘हे’ आहेत दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन्स, २४ जीबी हाय स्पीड डेटासह मिळणार…

यापूर्वी अशी बातमी समोर आली होती की, आयफोन १५ सीरिजला सध्याच्या आयफोन १४ प्रमाणेच मागणी असेल. टेक जायंट यावर्षी आयफोन १५ सिरीजमधील ८५ दशलक्ष युनिट्सचे उत्पादन करण्याची योजना आखत आहे.

आयफोन १५ सिरीजमधील मॉडेलची अपेक्षित किंमत

Apple Hub (Tim Long from Barclays चा हवाला ) देऊन आयफोन १५ ची किंमत $७९९ (अंदाजे ६५,७०० रुपये) या किंमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर आयफोन १५ प्लसची सुरुवातीची किंमत $८९९ (अंदाजे ७३,९००), आयफोन १५ प्रो ची किंमत $१,०९९ (अंदाजे ९०,१००) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि iPhone 15 Pro Max ची किंमत $१,२९९ (अंदाजे १,०६,५०० रुपये ) असण्याची शक्यता आहे.

अशी अपेक्षा आहे की या iPhone 15 मॉडेल्सच्या किंमतीमध्ये भारतात देखील अशी वाढ बघायला मिळेल.

अलीकडेच अशी बातमी समोर आली होती की, आयफोन १५ सिरीज लॉन्च होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. बँक ऑफ अमेरिका येथील जागतिक सिक्युरिटीज विश्लेषक, वामसी मोहन यांच्या मते आयफोन १५ सिरीजचे लॉन्चिंग वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जाण्याची शक्यता आहे. विश्लेषकाने या विलंबाचे नेमके कारण नमूद केलेले नाही.