Apple iPhone 16e launched In India : जगातील लोकप्रिय कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपलच्या नवीन आयफोन एस ई ४ (iPhone SE 4) ची गेल्या अनेक दिवसांपासून बरीच चर्चा होत होती. पण, आता समोर आलेल्या माहितीनुसार iPhone SE 4 ऐवजी आता कंपनीने आयफोन १६ ई (iPhone 16e) भारतात लाँच केला आहे. तसेच खास गोष्ट म्हणजे आयफोन स्वस्तात मिळावा अशी ग्राहकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण आयफोन १६ सीरिजमधील iPhone 16e हा फोन सगळ्यात स्वस्त असणार आहे. तर भारतात लाँच झालेल्या ॲपलच्या नवीन फोनची किंमत, फीचर्स आणि तुम्ही हा कधीपासून ऑर्डर करू शकणार आहात याबद्दल बातमीतून सविस्तर जाणून घेऊया…
नव्या आयफोनची भारतातील किंमत आणि प्री-ऑर्डरबद्दल माहिती –
नव्या आयफोनची भारतातील किंमत आणि प्री-ऑर्डरबद्दल माहिती – आयफोन 16e च्या बेस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत यूएसएमध्ये $599 म्हणजेच अंदाजे ४९ हजार ५०० रुपयांपासून सुरू होते, तर भारतात iPhone 16e मॉडेलची किंमत ५९ हजार ९०० रुपये असणार आहे. iPhone 16e च्या २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे, तर ५१२ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ८९,९०० रुपये आहे, त्यामुळे दोन्ही फोनच्या किमतीत २० हजार रुपयांचे अंतर आहे. तसेच तुम्ही नवीन iPhone 16e साठीची प्री-ऑर्डर उद्या, म्हणजेच २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि २८ फेब्रुवारीपासून डिलिव्हरी देण्यास सुरुवात होईल.
नवीन डिझाइन आणि डिस्प्ले –
iPhone 16e मध्ये ६.१ इंचाचा OLED डिस्प्ले, फेस आयडी सिस्टम आहे. iPhone SE सीरिजमध्ये दिसणाऱ्या म्यूट स्विचऐवजी एक ॲक्शन बटण देण्यात आले आहे. ॲक्शन बटणद्वारे युजर्स कॅमेरा किंवा डू नॉट डिस्टर्ब मोड ॲक्टिव्ह करू शकतात. याव्यतिरिक्त फोनमध्ये यूएसबी-सी (USB-C) पोर्टसुद्धा असणार आहे.
ए १८ चिप –
ॲपलच्या iPhone 16e मध्ये A18 चिपचा वापर करण्यात आला आहे. A18 चिपमध्ये 6 कोर CPU आहे, जो ॲपलच्या A13 बायोनिक चिपपेक्षा ८० टक्क्यांपर्यंत वेगवान आहे, जो आयफोन ११ मध्ये देण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये 4 कोर GPU आणि 16 कोर न्यूरल इंजिनदेखील आहे, जे मशीन लर्निंग कार्ये अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ॲपलच्या मते, न्यूरल इंजिन एआय मॉडेल्सवर A13 पेक्षा सहापट वेगाने काम करू शकते. तसेच iPhone 16e ॲपल इंटेलिजन्स (Apple Intelligence) लादेखील सपोर्ट करतो. आयफोनमध्ये एआय फीचर्स जसे की, Genmoji, काही लेखन साधने आणि चॅटजीपीटी ChatGPT आदी टूल्सचा समावेश असणार आहे.
तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅमेरा बद्दल जाणून घेऊया…
iPhone 16e मध्ये सिंगल ४८ एमपी फ्यूजन रियर कॅमेरा दिला आहे, जो हाय-रिझोल्यूशनसह फोटो कॅप्चर करेल. कॅमेरा सिस्टमला 2x टेलिफोटो झूम पर्याय दिला आहे, ज्यामुळे युजर्सना मूळ फोटोची क्वाॅलिटी राखून अगदी फोटो झूम करून सहज काढता येऊ शकतो. डिव्हाइस २४ एमपीमध्येसुद्धा फोटो घेऊ शकते. पण, हाय-रिझोल्यूशन शॉट्ससाठी कॅमेरा ४८ एमपी मोडवरसुद्धा स्विच केला जाऊ शकतो. कॅमेरा सिस्टीम पोर्ट्रेट मोड, नाईट मोड आणि एचडीआरला वेगवेगळ्या लाईट्समध्ये फोटोची क्वाॅलिटी टिकवून ठेवण्यास मदत करेल. तसेच या आयफोनमध्ये ऑटोफोकससह १२ एमपी ट्रू डेप्थ कॅमेरा आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी फ्रेम्स पर सेकंद आणि डॉल्बी व्हिजनपर्यंत ४के रेकॉर्डिंगलासुद्धा सपोर्ट करतो.
बॅटरी लाइफ आणि कनेक्टिव्हिटी –
iPhone 16e २६ तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो. हे उपकरण वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते आणि त्यात सॅटेलाइट आणि इमर्जन्सी एसओएसद्वारे मेसेज यांसारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्ससुद्धा समावेश करण्यात आला आहे, जे युजर्स मर्यादित सेल्युलर कव्हरेज असलेल्या भागात संभाषणासाठी सेवा पर्याय प्रदान करते आहे. यात क्रॅश डिटेक्शनदेखील समाविष्ट आहे, जे गंभीर अपघात झाल्यास आपत्कालीन सेवांना आपोआप अलर्ट करू शकते. पण, हे फीचर केवळ यूएससाठी असेल की भारतीयांसाठी याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही