Apple iphone crash detection system : अ‍ॅपल आयफोनचे फीचर्स हे लोकांचा जीव वाचवण्यासाठी मदत करत असल्याचे काही घटनांतून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी अलास्कातील बर्फाळ प्रदेशात अडकलेली व्यक्ती आयफोनच्या मदतीने बचावल्याचे समोर आले होते. iPhone 14 मधील एसओएस सॅटेलाइट केनेक्टिव्हिटी फीचरचा वापर करून व्यक्तीने मदतीसाठी संदेश पाठवला होता, त्यावरून बचाव पथकाला तिला शोधता आले. आता आयफोनच्या crash detection feature ने एका महिलेचा जीव वाचवण्यात मदत केल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेड्डिट पोस्टनुसार, अलीकडेच झालेल्या एका अपघातात, iPhone 14 मधील क्रॅश डिटेक्शन फीचरने विवाहीतेचा अपघात झाल्यानंतर ताबडतोब तिच्या पतीला अलर्ट केले. क्रॅश डिटेक्शन फीचरमुळे पतीला अपघाताचे नेमके स्थळ मिळण्यासाठी मदत झाली.

(Apple युजर्सना मिळणार ‘हे’ सर्वात मोठे फीचर, सध्या Android युजर्स घेत आहेत लाभ, जाणून घ्या)

रेड्डिटनुसार, अपघात झाला तेव्हा पती त्याच्या पत्नीसोबत फोनद्वारे संपर्कात होता. मात्र, क्रॅश डिटेक्शन फिचरमुळे त्याला अपघात स्थळी पोहोचण्यात मदत झाली आणि रुग्णवाहिका येण्यापूर्वी तो पत्नीला मदत देऊ शकला.

मी माझ्या पत्नीशी फोनवरून बोलत होतो तेव्हा ती स्टोअरवरून घराकडे येत होती. या दरम्यान मी तिची किंकाळी ऐकली आणि लाइन डेड झाली. त्यानंतर काही सेकंदातच मला माझ्या पत्नीच्या आयफोनवरून एक सूचना मिळाली की, ती क्रॅश झाली आणि तिचे अचूक स्थान मिळाले, असे व्यक्तीने रेड्डिटवर लिहिले आहे.

(OnePlus sale : स्मार्टफोनवर चक्क ५००० रुपयांची सूट! जाणून घ्या OnePlus 10T, OnePlus Nord 2T आणि हेडफोन्सची किंमत)

क्रॅश डिटेक्शन फीचर कसे काम करते?

क्रॅश डिटेक्शन फीचर इमरजन्सी एसओएस सुरू करते जे युजरच्या इमरजेन्सी लिस्टमधील व्यक्तीला संपर्क साधते. एक अल्गोरिदम आयफोनमधील माहिती वापरतो आणि क्रॅश झाला आहे की नाही हे निर्धारित करतो आणि नंतर मदतीसाठी कॉल करतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple iphone crash detection system alert man about his wife accident ssb
Show comments