आयफोन कंपनी वार्षिक परंपरेचे पालन करून नवीन वर्षात नवीन आयफोन म्हणजेच आयफोन १६ सीरिज लाँच करणार आहे. गेल्या वर्षी आयफोन १५ सीरिज ग्राहकांच्या पसंतीस उतरली. त्यामधील नेव्हिगेशन सिस्टीम भारतीय होती. हा दमदार आयफोन भारतात तयार झाला होता. मग आता आगामी आयफोन १६ सीरिजमध्ये कोणत्या खास गोष्टी असणार आहेत यावर एक नजर टाकू.
आगामी आयफोन १६ प्रो व आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये आयफोन १५ प्रोमधील काही फीचर्स समान असतील; पण त्याचबरोबर काही नवीन फीचर्ससुद्धा वापरकर्त्यांना अनुभवायला मिळतील. या नवीन फीचर्समध्ये मोठ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीचा समावेश असेल. त्याचबरोबर त्यात कॅपॅसिटिव्ह कॅप्चर बटणसुद्धा असेल. व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी एक खास बटण असेल; जे व्हॉल्युम आणि पॉवर बटणांपेक्षा वेगळे असेल. आयफोनच्या फ्रेमसह एक फ्लॅशसुद्धा असणार आहे.
हेही वाचा…VI फाउंडेशनचे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर ! समजून घ्या काय असणार खास…
आयफोनच्या नवीन सीरिज आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये वापरकर्त्यांना मोठा डिस्प्ले मिळेल. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार डिस्प्लेचा दावा करण्यात आला आहे. आयफोन १६ प्रो मध्ये ६.२७ इंच स्क्रीन, तर आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये ६.८६ इंचांची स्क्रीन असेल; जो आतापर्यंतचा सगळ्यात मोठा डिस्प्ले ठरेल. प्रो मॉडेल्समध्ये लो-टेंपरेचर पॉलिक्रिस्टेलीन ऑक्साइड टेक्नॉलॉजी आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटची क्षमता असेल. आयफोन १६ आणि आयफोन १६ प्रो या मॉडेल्समध्ये ६.१५ इंच आणि ६.६९ इंच डिस्प्ले साईजसह ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल.
आयफोन १६ सीरिजसंबंधीच्या काही खास फीचर्स जाणून घेऊ.
- नवीन रंग (New colour) : आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये ‘ग्रेड ५ Titanium’ चा वापर किंवा काळा, गुलाबी या नवीन रंगांचा वापर करण्यात येणार आहे.
- कॅमेरा (Camera) : आगामी फोनमध्ये “टेट्रा-प्रिझम” टेलीफोटो लेन्सचा समावेश आहे; जी 5x क्लोज-अप फोटोग्राफीसाठी फायदेशीर ठरेल. आयफोन १५ प्रो मध्ये १२ एमपी कॅमेरा होता; तर आयफोन १६ प्रोमध्ये 48MP अल्ट्रावाइड कॅमेर्याच्या स्वरूपात असेल, असे सांगण्यात येत आहे.
- प्रोसेसर (Processor) : आयफोन १६ A18 सीरिज चिप्सद्वारे उपलब्ध असेल. त्यामुळे ग्राहकांमध्ये आता आयफोनच्या आगामी आयफोन १६ सीरिजबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.