दिवाळीच्या तोंडावर अनेक कंपन्यांनी वस्तूंवर तगडा डिस्काउंट देणं सुरु केला आहे. आता अॅपल देखील या ट्रेंडमध्ये सामील झाले आहे. देशातील अनेक स्मार्टफोन युजर्स आयफोनसाठी अक्षरशः वेडे आहेत. आता आयफोन घेण्यासाठी हीच संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. अॅपलने भारतात दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी विक्री सुरू केली आहे. सेल दरम्यान कंपनी आयफोन, आयपॅड, मॅकबुक इत्यादी अॅपलच्या अनेक उत्पादनांवर मोठी सूट देत आहे. कंपनी नुकत्याच लाँच झालेल्या Apple iPhone 15 सीरीजवरही सूट देणार आहे.

Apple Diwali Sale मध्ये अनेक उत्पादने स्वस्तात खरेदी करता येतात. या सेलमध्ये ग्राहकांना १०,००० रुपयांपर्यंत सूट/कॅशबॅक मिळू शकतो. कंपनीने iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max वर ६,००० रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली आहे. त्याच वेळी, ग्राहकांना iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर ५,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. कंपनी iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर ४,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे. त्याच वेळी, ग्राहकांना iPhone 13 वर ३,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. iPhone SE खरेदी करून तुम्ही २००० रुपये वाचवू शकता.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर

(हे ही वाचा : फक्त ९९९ रूपयांमध्ये लॉन्च झाला नोकियाचा 105 Classic फोन; UPI फीचरसह मिळणार… )

iPhone 15 ची सुरुवातीची किंमत ७९,००० रुपये ठेवण्यात आली होती. तर iPhone 15 Plus ८९,९०० रुपयांना लाँच करण्यात आला होता. कंपनीने iPhone 15 Pro १,३४,००० रुपयांना सादर केला, तर iPhone 15 Pro Max १,५९,९०० रुपयांना सादर केला. कंपनीने आता iPhone 13 ला ५९,९०० रुपयांना लिस्ट केले आहे.

MacBook Air M2 वर देखील सूट आहे ज्या अंतर्गत कंपनी १०,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. ही ऑफर केवळ १३ इंच आणि १५ इंच मॉडेल्सवर उपलब्ध आहे. 13 MacBook Air M2 सुरुवातीला १,१४,९०० ला लाँच करण्यात आला होता. MacBook Air M1 बद्दल बोलायचे झाले तर, कंपनी त्यावर ८,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. कंपनी २४ इंच iMac आणि Mac mini वर ५,००० रुपयांचा कॅशबॅक देत आहे.

ग्राहक iPad Pro (११ इंच आणि १२.९ इंच मॉडेल) आणि iPad Air वर ५,००० रुपये वाचवू शकतात. कंपनी 9व्या आणि 10व्या जनरेशनच्या iPad वर अनुक्रमे ३,००० आणि ४,००० रुपयांची सूट देत आहे. आयपॅड मिनी दिवाळी सेलमध्ये ३,००० रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल. ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही Apple अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Story img Loader