Apple 16 Launch Event 2024 Live Streaming : आयफोन निर्माता ॲपलचा वर्षातील सर्वात मोठा लाँच इव्हेंट आज ९ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे, ज्याची टॅगलाइन ‘इट्स ग्लोटाइम’ आहे. ॲपलचा सप्टेंबरचा इव्हेंट मुख्यतः नवीन फ्लॅगशिप डिव्हाइसेसवर लक्ष केंद्रित करतो. तसेच Macs आणि हाय-एंड iPads सहा महिन्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लाँच होतील. पण, या इव्हेंटमध्ये आयफोन व ॲपल वॉच लाँच होणार हे मात्र नक्की आहे; तर आजच्या लाइव्ह इव्हेंटबद्दल तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील ना? चला तर, या प्रश्नांची उत्तरे या लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…

प्रश्न : ॲपल ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंट किती वाजता सुरू होणार?

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी
CET , Revised schedule, entrance exams, CET Cell,
सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, काय आहेत बदल?
EC on Delhi Election 2025 Dates| Delhi Election 2025 Dates Schedule
Delhi Election 2025 Dates : ठरलं! दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला आणि निकाल ८ फेब्रुवारीला; निवडणूक आयुक्तांची घोषणा
Realme 14 Pro 5G Series Launch in India
नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर जरा थांबा! रिअलमीचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात होणार लाँच; थंड तापमानात रंग बदलणार

उत्तर : Apple ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंट सोमवारी म्हणजेच आज, ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता यूएसएमध्ये होणार आहे; तर भारतातील युजर्स ९ सप्टेंबर रोजी IST रात्री १० वाजून ३० मिनिटांपासून हा ॲपल २०२४ इव्हेंट लाइव्ह पाहू शकतात.

प्रश्न : मी ॲपल ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंट कुठे पाहू शकतो?

उत्तर : ॲपल जगातल्या सर्व युजर्ससाठी संपूर्ण कार्यक्रम लाइव्ह सुरू ठेवणार आहे आणि तुम्ही ॲपलच्या अधिकृत वेबसाइटवर, यूट्यूब चॅनेलवर आणि ॲपल टीव्ही ॲपद्वारे कार्यक्रम लाइव्ह पाहू शकता.

प्रश्न : ॲपल त्यांचा ९ सप्टेंबरचा कार्यक्रम कुठे आयोजित करेल?

उत्तर : तर हा कार्यक्रम स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडणार आहे. हे ठिकाण ॲपलच्या लाँच इव्हेंटचे मुख्य ठिकाण आणि टेक इनोव्हेशनचे केंद्र म्हणून काम करते.

हेही वाचा…iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max: आयफोन १६ साठी खर्च करणे किती फायद्याचे? पाहा ‘हे’ चार फीचर्स

प्रश्न : ॲपल नवीन आयफोन लाँच करत आहे?

उत्तर : आयफोन १६ सीरिज या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. ॲपल या इव्हेंटमध्ये आयफोन १६ मालिकेतील चार मॉडेल सादर करू शकते, ज्यामध्ये कॅमेरा, तंत्रज्ञान, प्रोसेसिंग पॉवर, डिस्प्ले असे अपडेटेड फीचर्स आणि नवीन रंग पर्यायदेखील अनावरण केले जाऊ शकते.

प्रश्न : ॲपल वॉचमध्ये काय अपडेट असणार?

उत्तर : ॲपल वॉच सीरिज १० मध्ये मोठा स्क्रीन डिस्प्ले, थिन डिझाइन, टिकाऊपणा, नवीन आरोग्य फीचर्सचा समावेश असणार आहे.

प्रश्न : एअरपॉड्समध्ये काय अपडेट असणार आहे ?

उत्तर : ॲपल फोर्थ जनरेशन एअरपॉड्सची घोषणा करेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे; ज्यामध्ये ऑडिओ क्वॉलिटी , नॉइज कॅन्सलेशन आणि यूएसबी-सी ( USB-C)पोर्टचा समावेश असणार आहे. तसेच, प्रथमच युजर्सना, कमी किमतीत ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन ऑफर केले जाणार आहे.

प्रश्न : ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये कोणत्या सॉफ्टवेअर अपडेट्सची अपेक्षा केली जाऊ शकते?

उत्तर : ॲपल कार्यक्रमादरम्यान आयओएस १८ (iOS 18) साठी रिलीजची तारीख जाहीर करेल आणि लवकरच रोलआउटसुद्धा करेल. याव्यतिरिक्त, iPadOS 18, watchOS 11 आणि tvOS 18 साठी अपडेट्स जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

हेही वाचा…Apple Event 2024: ॲपल इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच, कोणते नाही? जाणून घेण्यासाठी वाचा ‘ही’ सविस्तर यादी

प्रश्न : ॲपलकडून ९ सप्टेंबर रोजी नवीन ॲक्सेसरीज लाँच केल्या जातील?

उत्तर : Apple च्या परंपरेनुसार, नवीन आयफोन केस, ॲपल वॉच बँड, नवीन कलर ऑप्शन्स आणि डिझाइनसह लॉंच केले जाणार आहेत. तसेच हे ॲक्सेसरीज इव्हेंटनंतर लगेचच खरेदीसाठी उपलब्धसुद्धा होतील.

प्रश्न : २०२४ मध्ये आणखी एक ॲपल इव्हेंट होईल का?

उत्तर : Apple सहसा ऑक्टोबरमध्ये मॅक आणि आयपॅड लाँचसाठी दुसरा कार्यक्रम आयोजित करेल.

त्यामुळे आज ९ सप्टेंबर रोजी ‘इट्स ग्लोटाईम’ इव्हेंटमध्ये Apple नवीन कल्पनांचे अनावरण करत असताना तुम्हीसुद्धा नक्की हा इव्हेंट लाइव्ह बघा.

Story img Loader