अॅप्पल कंपनीने केवळ आयफोन १४ सिरीजचे फोनच नव्हे तर हात घडाळ आणि एअरपॉड्स सुद्धा लाँच केले आहेत. काल अॅप्पल कंपनीचा इव्हेंट झाला होता. यामध्ये या घडाळींचे लाँच करण्यात आले. कंपनीने तीन घडळींना लाँच केले आहे. यामध्ये अॅप्पल वाच सिरीज ८, अॅप्पल वाच एसई आणि अॅप्पल वॉच अल्ट्राचा समावेश आहे. या वॉचमध्ये काही नवीन फिचर्स देण्यात आले आहे. आरोग्याशी संबंधित नवीन फिचर्सचा यात समावेश करण्यात आला आहे.
कंपनीच्या नवीनतम स्मार्टवॉचच्या जीपीएस मॉडेलची किंमत 29 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. वॉच सीरीज 8 ची किंमत 45 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. वॉच अल्ट्राची किंमत 89 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. या स्मार्ट घड्याळ अॅप्पलने प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
एअरपॉड प्रो२ लाँच. इतकी आहे किंमत
फोनबरोबरच अॅप्पल आपल्या एअरपॉड्ससाठी देखील प्रसिद्ध आहे. कंपनीने नवीन एअरपॉड्स प्रो २ देखील लॉन्च केला आहे. AirPods Pro 2 ची किंमत 26 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याची प्री ऑर्डर 9 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ते 23 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध राहील.
अॅप्पल वॉच सिरीज ८
अॅप्पल वॉच सिरीज ८ मध्य बिल्ट इन टेंप्रेचर सेंसर आणि हेल्थ ट्रॅकिंग देण्यात आला आहे. क्रॅश डिटेक्शन नावाचे सुरक्षा फिचर देण्यात आले आहे. जे अपघाताच्या स्थितीत संबंधितांना अलर्ट करण्याचे काम करेल. याने जखमी व्यक्तीला तात्काळ मदत मिळेल. या घडाळीची बॅटरी फूल चार्ज झाल्यानंतर १८ तास चालणार.
(Apple : Iphone 14 आणि 14 Plus मधील ‘हे’ फरक जाणून घ्या, निवड करणे सोपे जाईल)
अॅप्पल वॉच अल्ट्रा
अॅप्पलचे हे घड्याळ टायटॅनियम बॉडीसह येते. स्मार्टवॉचच्या मोठ्या स्क्रीनसाठी यामध्ये नवीन वेफाइंडर वॉच फेस देण्यात आला आहे. अॅपलने या घड्याळात नवीन अॅक्शन बटण दिले आहे. त्याच्या मदतीने घडाळीत विविध कार्ये सक्रिय केली जाऊ शकतात. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज झाली की ती 36 तास चालते. जर ते लो पॉवर सेटिंगमध्ये वापरले तर त्याची बॅटरी 60 तासांपर्यंत बॅकअप देते. या घड्याळीचा जीपीएस अचूक असल्याचे अॅप्पलचे म्हणणे आहे.
अॅप्पल वॉच एसई
या घडाळीत देखील क्रॅश डिटेक्शन फिचर देण्यात आला आहे. नवीन Apple Watch SE मध्ये एस ८ चिपसेट देण्यात आला आहे, ज्यामुळे हे घड्याळ मागील वेरिएंटपेक्षा 20 टक्के वेगाने काम करते. ही घडाळ सिल्व्हर, मिडनाईट आणि स्टारलिट रंगात येते. यामध्ये रेटिना ओएलईडी डिस्प्ले, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, इमर्जन्सी एसओएस, फॉल डिटेक्शन फिचर मिळते, तसेच ५० मीटरपर्यंतचा वॉटर रेझिस्टन्स देखील मिळतो.
एअर पॉड्स प्रो २nd जनरेशन
या नव्या एअर पॉडमध्ये नवीन एच २ चिपसेट आहे. यामुळे चांगला आवाज मिळतो. तसेच या पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा चांगले नॉइज कॅन्सलेशन सिस्टीम देण्यात आले आहे. तसेच यात अडॅप्टिव्ह ट्रन्सपरेन्सी फिचर आहे जे योग्यवेळी मोठा आवाज कमी करतो. नवीन टच कंट्रोल्समुळे म्युझिक प्लेबॅक आणि कॉलिंगचा अनुभव देखील पूर्वीपेक्षा चांगला आहे. सिंगल चार्जमध्ये हा एअरपॉड ६ घंटे चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.