Apple ने भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्याची पुष्टी केली आहे. अ‍ॅपलचे भारतातील पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मुंबईत सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन लवकरच होणार आहे. मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अ‍ॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अ‍ॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या जातील. स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अ‍ॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात येणार आहे.

Apple च्या पहिल्या स्टोअरचा अनुभव वापरकर्ते Apple BKC वॉलपेपर डाउनलोड करून घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला स्पेशल साउंड आणि Apple म्युझिकची प्ले-लिस्ट मिळणार आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये Apple कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे. पुढील माहिन्यात हे पहिले फ्लॅगशिप स्टोअर मुंबईमध्ये उघडण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरे फ्लॅगशिप रिटेल स्टोअर हे राजधानी दिल्ली मध्ये उभारले जाणार आहे. भारतामध्ये सध्या Apple चे फक्त ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे. इतर स्टोअर्स हे कंपनीचे अधिकृत स्टोअर्स आहेत. Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. 

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस

हेही वाचा : Apple वापरकर्त्यांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी सुरु होणार भारतातील पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर

Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग एप्रिल ते जून या महिन्यामध्ये दरम्यान होणार आहे.

Apple ची पुरवठादार Foxconn कंपनीला एअरपॉड्स तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. फॉक्सकॉन हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ७०% आयफोन बनवतो. आता कंपनीला प्रथमच एअरपॉडचे कंत्राट मिळाले आहे.  फॉक्सकॉन ही कंपनी या निमित्ताने भारतामध्ये $२०० दशलक्ष म्हणजेच सुमारे १,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

हेही वाचा : Google Layoffs: कर्मचारी कपातीविरोधात लंडनमधील कर्मचाऱ्यांचे वॉकआऊट; युनाइटचे ​​अधिकारी मॅट व्हेली म्हणाले, “जोपर्यंत गुगल…”

फॉक्सकॉन कंपनीसह Wistron Corp आणि Pegatron Corp सारख्या कंपन्या देखील भारतात Apple ची उत्पादने तयार करत आहेत. फॉक्सकॉनच्या नवीन प्लांटमधील उत्पादन हे २०२४ च्या अखेरीस सुरु होऊ शकते. यासाठी कंपनी भारतात इअरफोन्स तयार करण्यासाठी भारतामध्ये कारखाना तयात करण्याची योजना तयार करत आहे. याच्याशी संबंधित दोन लोकांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.