अ‍ॅपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत नवनवीन उत्पादने लॉन्च करत असते. अ‍ॅपल कंपनीने भारतात अधिक शक्तिशाली असणारे असे मॅकबुक प्रो लॅपटॉपची एक नवीन लाइन अप लॉन्च केली आहे. नवीन लॅपटॉपमध्ये एम ३ लाइन चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. ३ एनएम चिपसेटचा वापर लॅपटॉप आणि कॉम्प्युटरसाठी केला जातो. अ‍ॅपल कंपनीने २०२१ नंतर मॉडेल अपडेट करत एक नवीन आयमॅक देखील लॉन्च केला आहे. नवीन मॅकबुक प्रो मॉडेलमध्ये M3, M3 Pro आणि M3 Max चिपसेटचे पर्याय देण्यात आले आहेत. iMac मध्ये M3 चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. या नवीन उत्पादनाबद्दल अधिक जाणून घेऊयात.

iMac : किंमत आणि उपलब्धता

करता येणार आहेत. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ८-कोर सीपीयू, ८ जीबी मेमरी, २५६ जीबीची एसएसडी आणि दोन थंडरबोल्ट पोर्टचा समावेश आहे. तेच यामध्ये एक मॅजिक कीबोर्ड आणि मॅजिक माउस देखील येतो. १० कोर GPU असणाऱ्या आयमॅकची किंमत १,४४,९०० रुपये आहे. विद्यार्थ्यांसाठी याची किंमत १,४४,९०० रुपयांपासून सुरु होते. हे उत्पादन तुम्हाला हिरवा., पिवळा , नारंगी, गुलाबी, जांभळा, निळा आणि चांदी रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. या मॉडेलमध्ये ८ -कोर सीपीयू, ८ जीबी मेमरी, एक २५६ जीबीचे एसएसडी, दोन थंडरबोल्ट पोर्ट, दोन अतिरिक्त यूएसबी ३ पोर्टचा समावेश आहे. यामध्ये एक मॅजिक कीबोर्ड येतो, जय्यमध्ये टच आयडी, एक मॅजिक माउस आणि गिगाबीट इथरनेटचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Microsofts big investment in Hinjewadi large amount of employment will be created
Hinjewadi IT Park : मायक्रोसॉफ्टची हिंजवडीत मोठी गुंतवणूक! मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Trade Connect, trade, Online Forum,
व्यापाराशी निगडित माहितीसाठी ‘ट्रेड कनेक्ट’, केंद्राकडून आयात-निर्यातदारांसाठी ऑनलाइन मंच
Growth at reasonable price is the investment formula of Baroda BNP Paribas Large and Midcap Fund
‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र : बडोदा बीएनपी पारिबा लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड
new ST buses, Tender process, ST bus,
पाच हजार नवीन एसटी बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार, १३१० खासगी एसटी बससाठी निविदा प्रक्रिया सुरू
Flipkart Big Billion Days Sale 2024
Big Billion Days Sale 2024 : ‘या’ चार स्मार्टफोन्स ब्रॅण्डवर कॅशबॅक, स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर सूट; कोणत्या वस्तूवर नेमकी किती सूट? जाणून घ्या
Airtel partnered with Apple to offer Apple TV+ and Apple Music
Airtel Partnered With Apple : एअरटेल ऑफर करणार Apple TV+ Apple Music; ॲपलबरोबरच्या पार्टनरशिपचा कसा होणार युजर्सना फायदा?
Best Selling Electric Scooter
Activa, Jupiter नव्हे तर देशातील बाजारात ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची तुफान विक्री; खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी

हेही वाचा : ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन हवे आहे? BSNL कडे आहेत ‘हे’ भन्नाट प्लॅन्स, जाणून घ्या

३० ऑक्टोबर म्हणजे आजपासून तुम्ही नवीन २४ इंचाचा iMac हे उत्पादन M3 सह कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवरून ऑर्डर करू शकणार आहेत. हे उत्पादन अमेरिकेसह २७ देशांमध्ये उपलब्ध आहे. याची डिलिव्हरी ७ नोहेंबरपासून सुरु होणार आहे. याची विक्री कंपनीचे अधिकृत स्टोअर आणि अधिकृत विक्रेत्यांमार्फत केली जाणार आहे.

MacBook Pro M3 : भारतातील किंमत

M3 चिपसेटसह मॅकबुक प्रो ची किंमत १,६९,९०० रुपयांपासून सुरु होते. तर M3 Pro चिपसेटचा सपोर्ट असणाऱ्या १४ इंचाच्या मॅकबुक प्रो ची किंमत १,९९,९०० रुपयांपासून सुरु होते. M3 चिपसेटचा सपोर्ट असणाऱ्या १६ इंचाच्या मॅकबुक प्रो ची किंमत २,४९,९०० रुपयांपासून सुरु होते. ८ टीबी एसडी आणि १२८ जीबी रॅम असणाऱ्या सर्वात महाग १६ इंचाच्या मॅकबुक M3 Max ची किंमत ७,१९,९०० रुपये तर १४ इंचाच्या मॅकबुक M3 मॅक्सची किंमत ६,८९,९०० रुपये आहे.

ग्राहक आजपासून नवीन मॅकबुक प्रो apple.com/in/store किंवा Apple स्टोअरवरून ऑर्डर करू शकतात. ७ नोहेंबर पासून याची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होणार आहे. याची विक्री कंपनीचे अधिकृत स्टोअर आणि अधिकृत विक्रेत्यांमार्फत केली जाणार आहे.