Apple Event Highlights: ॲपल (Apple) ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रॉडक्ट्स कंपनी लाँच करत असते. तर काल कंपनीचा ॲपल ‘लेट लुज’ इव्हेंट (Apple ‘Let Loose’ event) पार पडला.तर हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर लाईव्ह होता. ॲपलचे सीईओ टिम कूक यांनी या लाईव्ह कार्यक्रमाची सुरुवात केली. नंतर ‘ॲपल व्हिजन प्रो’ (Apple Vision Pro) ची झलक दाखवून ते कसं काम करते यावर चर्चा केली. त्यानंतर आयपॅड प्रो, आयपॅड एअर, मॅजिक कीबोर्ड, पेन्सिल प्रो या उपकरणांबद्दल एक-एक करून माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आयपॅड एअर (iPad Air) –
त्यानंतर सगळ्यात पहिला आयपॅड एअर (iPad Air) बद्दल सांगितले. नवीन आयपॅड एअर ११ आणि १३ इंच अशा दोन आकारात असणार आहे. एकापेक्षा अधिक कामे करण्यास मदत करणाच्या दृष्टीने बनविण्यात आलेला आयपॅड एअरमध्ये सेंटर स्टेजसह समोरचा फ्रंट कॅमेरा हे प्रमुख आकर्षणांपैकी एक असणार आहे. दोन्ही आयपॅड एअर ५० टक्के जलद आणि एम २ (M2) चिप्सद्वारे समर्थित आहेत. डिव्हाइस एआय फीचर्सना समर्थन देते आहे. ॲपल आयपॅड एअरमध्ये चार फिनिश, लँडस्केप स्टिरिओ ऑडिओ, मॅजिक कीबोर्ड, 5G कनेक्टिव्हिटी, १२ एमपी कॅमेरा आणि ११ टीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध असणार आहे.
आयपॅड प्रो ( iPad Pro) –
नवीन आयपॅड प्रो एकदम स्लिम, जबरदस्त डिझाइनसह Exceptional पर्फोमन्स देणारा आहे.आयपॅड प्रो दोन आकारात येतो ; एक ११ इंच आणि १३ इंच. आयपॅड प्रो आयपॅड नॅनोपेक्षा स्लिम आहे ; ज्यामुळे ते ॲपलचे सर्वात Thin उत्पादन म्हणून ओळखले जाणार आहे. सिल्व्हर आणि ब्लॅक असे दोन रंग पर्याय युजर्ससाठी असणार आहेत. आयपॅड प्रोला OLED तंत्रज्ञान मिळते ; जे iPad Pros ची व्हिज्युअल कार्यक्षमता वाढवते. तंत्रज्ञानाला XDR व्हिजनसह Tandem OLED म्हणतात. कारण – हा डिस्प्ले जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असल्याचे म्हटले जाते.
आयपॅड प्रोमध्ये M4 चिप (M4 chip) –
नवीन M4 चिप ही M3 चिपच्या तुलनेत एक महत्त्वाची सुधारणा आहे. हे M2 पेक्षा ५० टक्क्यांपर्यंत वेगवान CPU गती देते. M4 चिप 10-कोर GPU सह येते जे; रेट्रेसिंगला (raytracing) गेम्सला सपोर्ट व सर्वात जलद प्रो रेंडरिंगला मदत करते. ॲपल म्हणते की, नवीन चिप ही iPad Pro चा कणा आहे ; जी AI सेवांच्या श्रेणीला समर्थन देण्यास सक्षम आहे. ४ के व्हिडीओतील बॅग्राऊंड आयसोलेट करू शकते.
फायनल कट प्रो आणि लॉजिक प्रो (Final Cut Pro and Logic Pro) –
मोठ्या हार्डवेअरची घोषणा केल्यानंतर ॲपलचे टीम सदस्य विल हुई यांनी फायनल कट प्रो आणि लॉजिक प्रो साठी रोमांचक अपडेट सादर केली. सर्वात लक्षणीय सुधारणांपैकी एक म्हणजे iPads साठी नवीन फायनल कट कॅमेरा फीचर सादर करणे व व्हिडीओ शूट दरम्यान त्यांचा थेट कॅमेरा म्हणून वापर करणे करता येणे हा असणार आहे.
हेही वाचा…इन्स्टाग्राम राहिले बाजूला आता X वरही होणार स्टोरी शेअर; कसे काम करणार ‘हे’ फीचर? जाणून घ्या
ॲपल पेन्सिल प्रो लाँच ( Apple Pencil Pro ) –
नवीन ॲपल पेन्सिल प्रोच्या बॅरलमध्ये एक सेन्सर समाविष्ट केलं आहे ; जो वापरकर्त्यांना टूल पॅलेटमध्ये स्पर्शिक प्रतिसाद देण्यासाठी मदत करेल. यादरम्यान तुमच्या गरजेनुसार स्वयंचलितपणे आकार बदलणे आणि रंग सादर करणे, एखादे चित्र काढताना फ्रंट किंवा बॅक करून तेथेही तुम्ही रंग भरू शकणार आहात ; जे आजवर तुम्ही कधीच अनुभवलं नसेल. तसेच ॲपल पेन्सिल प्रो फाईंड माय (Find My) तंत्रज्ञानाला सपोर्ट करते ; जे हरवल्यावर शोधण्यास सोपे पडते.
नवीन लाँच होणाऱ्या ॲपल प्रोडक्ट्सची किंमत काय असणार आहे ?
११ आणि १३ इंचाचा आयपॅड एअर १२८ जीबी , २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टीबी स्टोरेज पर्यायांसह एअर निळ्या, जांभळ्या, स्टारलाईट आणि स्पेस ग्रे रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. ११ इंच वाय-फाय मॉडेलची किंमत ५९,००० रुपये आणि वाय-फाय सेल्युलर मॉडेलची किंमत ७४,९०० रुपये असणार आहे.
तर १३ इंच वाय-फाय मॉडेलची किंमत ७९,९०० रुपये आणि वाय-फाय सेल्युलर मॉडेलची किंमत ९४,९०० रुपयांपासून सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त, नवीन ॲपल पेन्सिल प्रोची किंमत ११ हजार ९०० रुपये आहे ; जी दोन्ही मॉडेल्ससाठी वापरता येईल.
आयपॅड प्रो ११ इंच वाय-फाय मॉडेलची किंमत ९९,९०० रुपये आणि वाय-फाय सेल्युलर मॉडेलची किंमत १,१९,९०० रुपये आहे. तर १३ इंचाचा आयपॅड प्रो वाय-फाय मॉडेलची किंमत १,२९,९०० रुपये आणि वाय-फाय सेल्युलर मॉडेलची किंमत १,४९,९०० रुपयांपासून सुरू होते.
काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध असलेला मॅजिक कीबोर्ड ११-इंच आणि १३-इंच आयपॅड एअरला सपोर्ट करतो आणि ११ इंच मॉडेलसाठी २९,९०० रुपये आणि १३ इंच मॉडेलसाठी ३३,९०० रुपये किंमत असणार आहे. Educational किंमत मॅजिक कीबोर्ड ऑफर करते ; ज्यात इंच मॉडेलची किंमत २७,९०० रुपये आणि १३ इंच मॉडेलसाठी ३१,९०० रुपये असेल तर लेआउट ३० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.