Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. कंपनीचे अनेक प्रॉडक्ट्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. Apple ही टेक कंपनी आहे. याचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे. कंपनी आयफोन ,आयफोन स्मार्टफोन, आयपॅड टॅब्लेट कम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअरचे देखील उत्पादन करते.  त्यातच आता एक नवीन माहिती समोर येत आहे. अ‍ॅपलची कंपनी हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर असलेली फॉक्सकॉन कंपनी त्यांच्या तामिळनाडू प्लांटमध्ये आयफोन १५ सीरिजचे उत्पादन सुरु करण्यासाठी तयार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आगामी लॉन्च होणाऱ्या आयफोन १५ फॉक्सकॉन कंपनी त्यांच्या श्रीपेरुंबदुर प्लांटमध्ये असेंबल करण्यासाठी तयारी करत आहे. फॉक्सकॉन शिवाय, ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे, पेगाट्रॉन आणि विस्ट्रॉन (लवकरच टाटा समूहाद्वारे अधिग्रहित केले जातील) देखील भारतात आयफोन 15 उत्पादनावर काम करत आहेत.

हेही वाचा : मोठी बातमी! आयफोननंतर आता AirPods पण होणार मेड इन इंडिया; ‘या’ ठिकाणी सुरू होणार उत्पादन

अ‍ॅपल २०१७ पासून भारतात आयफोनचे उत्पादन करत आहे. iPhone SE हे देशात तयार करण्यात आलेले पाहशील मॉडेल होते. गेल्या वर्षी, कंपनीने लॉन्चच्या तीन महिन्यानंतर आयफोन १४ चे उत्पादन सुरू केले होते. यावर्षी कंपनी तिच्या भारत आणि चीन उत्पादन टाइमलाइनमधील अंतर करत आहे. अधिकृत लॉन्च झाल्यानंतर काही आठवड्यांत ‘मेड-इन-इंडिया’ आयफोन 15 बाजारात दिसू शकतो.

तथापि कंपनी आयफोन्सचे बेस व्हेरिएंट तयार करत आहे. तर प्रो आयफोन्स मॉडेल अजूनही चीनमध्ये तयार केले जातात. अलीकडेच फॉक्सकॉन कंपनीने हैद्राबाद प्लांटसाठी ४०० मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत मोठ्या प्रमाणावर याचे उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. ”फॉक्सकॉन हैदराबाद येथील फॅक्टरीत AirPods चे उत्पादन करेल. डिसेंबरपर्यंत फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु होण्याची अपेक्षा आहे.” असे एका सूत्राने पीटीआयला सांगितले.

हेही वाचा : टाटाचे टेक्नॉलॉजीत मोठे पाऊल! भारतात तयार होणार ‘मेड इन इंडिया आयफोन’, चीनला बसणार मोठा झटका

अमेरिका आणि चीन यांच्यात असलेल्या राजकीय तणावामुळे कंपनी आपले उत्पादन हळूहळू चीनच्या बाहेर नेत आहे. याचा फायदा भारताने सर्वाधिक घेतला आहे, जिथे ७ टक्के आयफोनचे उत्पादन भारतात होते. केवळ उत्पादनच नाही तर कंपनी iPhones चा अधिक प्रचार आणि विक्री करण्यासाठी दुप्पट प्रयत्न करत आहे. अॅपलकडे आता दोन अधिकृत स्टोअर्स आहेत. आयफोन मार्केटमध्ये भारत जगात पाचव्या क्रमांकांवर आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple manufacturing iphone 15 in tamilnadu sriperumbudur plant foxcon indian check details tmb 01