अॅप्पल (Apple) या वर्षाच्या शेवटी आयफोन १४ सीरीज लाँच करणार आहे. लाइनअप २०२१ मध्ये लाँच केलेल्या Apple iPhone 13 सीरीजची जागा घेईल. नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लाँच केल्यामुळे, टेक जायंट आयफोन ११ सीरीज देखील बंद करू शकते. iDropNews च्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी खुलासा केला आहे की कंपनी आयफोन १४ सीरीज लाँचझाल्यानंतर आयफोन ११ सीरीजची विक्री थांबवेल. सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन आयफोन ११ हा होता.
अहवालात असेही म्हटले आहे की आयफोन ११ नवीन लाँच झालेल्या iPhone SE 2022 मधून विक्री काढून घेत आहे या वस्तुस्थितीमुळे हे पाऊल असू शकते. आयफोन ११ हा सर्वात लोकप्रिय आयफोन पैकी एक आहे. २०१९ मध्ये लाँच झालेला हा २०२० चा जागतिक स्तरावर सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन होता.
(हे ही वाचा: साबण कोणत्याही रंगाचा असो पण, त्याचा फेस फक्त पांढराच येतो? जाणून घ्या)
‘हे’ असू शकते कारण
आयफोन ११ आयफोन SE 2022 पेक्षा तुलनेने जुना आणि हळू असला तरी, अतिरिक्त मागील कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्लेमुळे नवीन SE मॉडेलपेक्षा अधिक विक्री झाल्याचे वृत्त आहे. अॅप्पल सहसा नवीन स्मार्टफोनच्या आगमनाने आपल्या जुन्या स्मार्टफोनच्या किमती कमी करते. या वर्षी असे झाल्यास, आयफोन ११ आणि आयफोन एस इ २०२२ समान किंमत श्रेणीमध्ये येतील.
(हे ही वाचा: Amazon फ्रेश कडून मँगो महोत्सवची घोषणा! २-३ तासात मिळणार घरपोच डिलेव्हरी)
आयफोन १२ ची किंमतही असेल कमी
अहवालात असेही समोर आले आहे की नवीन आयफोन लाँच झाल्यामुळे आयफोन १२ सीरीजच्या किमतीतही कपात केली जाईल आणि शक्यतो आयफोन ११ ची किंमत सध्या आहे त्याच पातळीवर असेल.