Apple UPI App: Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गॅजेट्स लॉन्च करत असते. नुकतेच Apple ने भारतामध्ये आपली दोन रिटेल स्टोअर्स सुरू केली आहेत. मुंबई आणि दिल्ली येथे रिटेल स्टोअर्स सुरू झाली आहेत. आता कंपनी लवकरच Google Pay, Paytm आणि इतर पेमेंट अ‍ॅपनंतर भारतात Apple Pay लॉन्च करू शकते. टेक जायंट देशामध्ये त्याचे डिजिटल पेमेंट अ‍ॅप लॉन्च करण्याबाबत नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) शी चर्चा करत आहे. याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून Apple या योजनेवर आता काम करत असल्याची माहिती समोर येत आहे.

अ‍ॅपलसाठी भारत एक महत्त्वाची बाजारपेठ बनली आहे. तसेच कंपनी भारतीय ग्राहकांसाठी Apple पे लॉन्च करण्यास उत्सुक आहे. देशामध्ये सध्या उपलब्ध असलेल्य्या अन्य डिजिटल पेमेंट अ‍ॅपसारखेच आयफोन वापरकर्त्यांना QR कोड स्कॅन करणे आणि UPI पेमेंट करण्याची परवानगी देईल. तथापि Apple आणि NPCI या दोघांनीही याबद्दलच्या ताज्या घडामोडींबद्दल भाष्य करणे टाळले आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

CCTV Rule In India
CCTV Rule In India : चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर येऊ शकते बंदी, भारत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; नेमकी कारण काय?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
cyber crimes on name of increasing subscriber likes and followers on social media
सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची बातमी… लाईक्स, फालोअर्स आणि सबस्क्राईबर…
third largest economy India marathi news
भारत २०३१ पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था
US Federal Reserve, interest rate cut
विश्लेषण : अमेरिकी ‘फेडरल रिझर्व्ह’ची व्याजदर कपात एवढी महत्त्वाची का? भारतातील बाजारावर काय परिणाम?
onion export duty marathi news
विश्लेषण: कांदा निर्यातीवरील शुल्क कमी होऊनही उत्पादक नाराज का?
Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
OpenAI launch o1 and o1 mini
OpenAI कडून नवीन एआय मॉडेल्स लाँच; स्पर्धा परीक्षांसाठी ठरणार उपयुक्त; जाणून घ्या वैशिष्ट्ये

हेही वाचा : VIDEO: Google भारतातील ‘या’ राज्यात उभारणार ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर; तब्बल १० अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक

भारताने नवीन कल्पना आणि प्रयोगांसाठी एक सुरक्षित मजबूत असे वातावरण तयार केले आहे. विशेषतः UPI डिजिटल पेमेंट प्रणाली सुरु केल्याने. देशातील लाखो लोकांसाठी युपीआय पेमेंट सेवा फायदेशीर ठरली आहे. खरेतर २०२२ ते २०२३ पर्यंत भारतात झालेल्या सर्व डिजिटल व्यवहारांसाठी ७५ टक्के UPI चा वापर झाला. २०२६ ते २०२७ पर्यंत प्रत्येक दिवसाला डिजिटल पेमेंट सेवा १ अब्ज व्यवहारांपर्यंत पोहोचेल असा तज्ञांचा अंदाज आहे. केवळ मे महिन्यातच नऊ अब्ज व्यवहारांची रेकॉर्डब्रेक नोंद NPCI ने केली आहे.

Apple Pay हे आयफोन, आयपॅड , Apple वॉच आणि मॅक यासह विविध Apple डिव्हाइसच्या माध्यमातून सोपे,सुरक्षित आणि खाजगी पेमेंटची सुविधा देईल. याचा वापर करणारे वापरकर्ते यामध्ये सहभागी असणाऱ्या बँकाचे क्रेडिट, डेबिट किंवा प्रीपेड कार्ड लिंक करू शकतात. शिवाय अमेरिकेमध्ये Apple नुकतीच आपली Pay Late सेवा सुरू केली आहे.