या वर्षीच अॅपल १४ सिरीज लाँच झाली, मात्र त्याबाबत फारशी चर्चा दिसून येत नाही, जेवढी आयफोन १५ बाबत दिसून येते. apple iphone 15 स्मार्टफोनबाबत अॅपलच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या फोनबाबत अनेक अफवा समोर आल्या. फोनचे लूक हटके असणार, फोल्डेबल असणार यांसह अनेक फीचर्सबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र हे कितपत खरे आहे, ते लाँच नंतरच कळेल. परंतु, लोकांमध्ये हा फोन चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान apple iphone 15 मध्ये यूएसबी टाइप सी चार्जर मिळेल का? हा प्रश्न उद्भवला आहे.
सर्व स्मार्टफोन USB Type C port ने सुसज्ज होण्यासाठी युरोपियन युनियनने अंतिम मुदत दिली आहे. याचा अर्थ अॅपला आपल्या लाइटनिंग केबलवर पाणी सोडावे लागेल. २८ डिसेंबर २०२४ पासून सर्व सदस्य राज्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या आयफोनसह सर्व स्मार्टफोनमध्ये सामान्य यूएसबी टाइप सी चार्जर असले पाहिजेत, असे युरोपियन युनियनचे नवीन निर्देश आहेत.यावरून अॅपलला आपल्या फोनमध्ये टाइपसी चार्जर द्यावे लागेल.
युरोपियन युनियनमध्ये विकल्या जाणारे टॅब्लेट, स्मार्टफोन आणि कॅमेऱ्यांना सामान्य यूएसबी टाइप सी पोर्ट असावे, अशा कायद्याला युरोपियन युनियनच्या खासदारांनी संमती दिली आहे. यावरून आयफोन मॉडोल्स, आयफोन १६ सिरीज जे २०२३ मध्ये लाँच होतील त्यांना टाइप सी पोर्ट मिळू शकतो, मात्र अॅपल आयफोन १५ मध्ये यूएसबी टाइप सी चार्जिंग देईल याची शक्यता कमी आहे.
अॅपलचे जागतिक मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रेग जोसविक यांनी एका परिषदेमध्ये नियम पाळावे लागेल, असे म्हटले होते. आमच्याकडे कोणताही पर्याय नाही, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, सर्व स्मार्ट उपकरणांसाठी समान चार्जर ठेवण्याचा भारताचा मानस आहे. अशात आयफोन १५ मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट मिळणार की नाही? हा काळच सांगले.