Apple ही एक लोकप्रिय टेक कंपनी आहे. या कंपनीचे आयफोन आणि अन्य उपकरण वापरण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. Apple भारतीय बाजारपेठमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अतिशय गंभीरपणे विचार करत आहे. Apple उत्पादनांच्या उत्पादक कंपन्या भारतात सातत्याने आपले प्लांट उभे करत आहेत. फॉक्सकॉन कंपनीने तर तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आता Apple भारतातील आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय बाजारपेठेमध्ये Apple कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे. पुढील माहिन्यात हे पहिले फ्लॅगशिप स्टोअर मुंबईमध्ये उघडण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरे फ्लॅगशिप रिटेल स्टोअर हे राजधानी दिल्ली मध्ये उभारले जाणार आहे. भारतामध्ये सध्या Apple चे फक्त ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे. इतर स्टोअर्स हे कंपनीचे अधिकृत स्टोअर्स आहेत. Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. याबाबतचे वृत्त Economic Times या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात Foxconn करणार मोठी गुंतवणूक; १ लाख नोकऱ्यांची होणार निर्मिती

Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग एप्रिल ते जून या महिन्यामध्ये दरम्यान होणार आहे.

Apple ची पुरवठादार Foxconn कंपनीला एअरपॉड्स तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. फॉक्सकॉन हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ७०% आयफोन बनवतो. आता कंपनीला प्रथमच एअरपॉडचे कंत्राट मिळाले आहे.  फॉक्सकॉन ही कंपनी या निमित्ताने भारतामध्ये $२०० दशलक्ष म्हणजेच सुमारे १,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

हेही वाचा : Foxcon कंपनीला प्रथमच मिळाली Airpods ची ऑर्डर; भारतातील ‘या’ राज्यात करणार तब्बल १६०० कोटींची गुंतवणूक

फॉक्सकॉन कंपनीसह Wistron Corp आणि Pegatron Corp सारख्या कंपन्या देखील भारतात Apple ची उत्पादने तयार करत आहेत. फॉक्सकॉनच्या नवीन प्लांटमधील उत्पादन हे २०२४ च्या अखेरीस सुरु होऊ शकते. यासाठी कंपनी भारतात इअरफोन्स तयार करण्यासाठी भारतामध्ये कारखाना तयात करण्याची योजना तयार करत आहे. याच्याशी संबंधित दोन लोकांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple open first flagship retail store in mumbai and delhi jio industry world drive mall tmb 01
Show comments