Apple plan to allow third party app : अलीकडे अ‍ॅपलची जोरदार चर्चा आहे. पुढील वर्षी कंपनी अनेक उत्पादने लाँच करण्याची शक्यता आहे. अ‍ॅपल आयफोन १५ अल्ट्रा देखील लाँच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच डिसेंबर २०२४ पासून अ‍ॅपलच्या स्मर्टफोनमध्ये यूएसबी टाइप सी चार्जिंग मिळू शकते. आता एक महत्वाचे फीचर युजर्सना मिळणार आहे. ब्लुमबर्गनुसार, अ‍ॅपल युजर्सना थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोअर्सवरून अ‍ॅप डाऊनलोड करू देण्याची योजना आखत असल्याचे समजते. यामुळे अ‍ॅपल युजर्सना अँड्रॉइड युजर्सप्रमाणे थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोअर्वरून अ‍ॅप्स डाऊनलोड करता येणार.

युरोपियन युनियनचा कायदा

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
Happy Children's Day 2024
Happy Children’s Day 2024 : जपान आणि भारताची मैत्री कशी झाली? नेहरूंनी टोकियोच्या मुलांना ‘हत्ती’ भेट दिल्याची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला?
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
aamir give advice to kiran rao to be nice wife
घटस्फोटानंतर चांगली जोडीदार होण्यासाठी सल्ला देणाऱ्या आमिर खानला किरण राव म्हणाली, “मी…”

युरोपियन युनियनने एक कायदा केला असून त्यात अ‍ॅपल ज्याला डिजिटल गेटकिपर म्हणून संबोधल्या जाते, त्यांना खुल्या बाजारपेठेची खात्री करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. अ‍ॅप स्टोअर निवडण्यासाठी युजरला निर्णय घेऊ देणे आवश्यक असून थर्ड पार्टी सेवांनाही आयओएसमध्ये भाग घेण्यासाठी संधी दिली पाहिजे, असा याचा अर्थ होतो.

(Billionaires List: पहिल्या स्थानावर अधिक काळ राहू शकतात Bernard Arnault, कारण Musk यांना बसलाय मोठा फटका)

अ‍ॅपलने युरोपियन युनियनचा कायदा पाळल्यास आयओएस युजर्सना त्यांच्या आवडीच्या अ‍ॅप स्टोअर्सवरून अ‍ॅप डाऊनलोड करता येणार. मात्र, असे करताना सुरक्षेची जबाबदारी ही युजरची असेल. युरोपियन युनियनच्या निर्णयाचा डेव्हलपर्सना देखील फायदा होईल.

डेव्हलपर्सना होणार फायदा

अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर या एका पर्यायामुळे डेव्हलपर्सना कमी फायदा होत होता. कारण अ‍ॅप्लिकेशनमधील पेमेंटमध्ये अ‍ॅपल ३० टक्के हिस्सा घेते. जर कंपनीने आयफोन आणि आयपॅड्समध्ये थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोअर वापरू चालवू दिले तर डेव्हलपर्सना दिलासा मिळेल, कारण त्यांना इतर अ‍ॅप स्टोअर्समध्ये अधिक कमिशन द्यावे लागणार नाही.

(BLUTOOTH CALLING आणि १२० स्पोर्ट्स मोडसह लाँच झाली ‘ही’ SMARTWATCH, किंमत केवळ १९९९ रुपये)

युरोपियन युनियनने उघड केलेल्या तपशिलानुसार अ‍ॅपलकडे आदेशाचे पालन करण्यासाठी २०२४ पर्यंतचा वेळ असेल. तथापि, अ‍ॅपलने काही अटी केल्या असून ती वापरकर्त्यांच्या सुरक्षेवर पाणी सोडणार नाही. कंपनी काही सुरक्षा आवश्यकता अनिवार्य करू शकते. कंपनी बाहेरील अ‍ॅप्सची पडताळणी करू शकते आणि त्यांच्याकडून शुल्क घेऊ शकते, असे सुत्रांचे म्हणणे आहे. याबाबत अ‍ॅपलकडून पुष्टी झालेली नाही.