ॲपल कंपनीची हवा मार्केटमध्ये सर्वत्र आहे. कंपनीच्या एअरपॉड्स, स्मार्टफोन्स, लॅपटॉप, आयपॅड आदी विविध वस्तू सगळ्यांनाच आकर्षित करतात. पण, या कंपनीच्या वस्तू अनेकदा महाग असतात. त्यामुळे कोणत्या प्रोडक्ट्समध्ये काय फीचर्स आहेत किंवा खरेदी करताना नक्की कोणतं प्रोडक्ट घ्यायचं, यामध्ये ग्राहकांचा नेहमी गोंधळ उडतो. तर आता ॲपलचे सीईओ टिम कुक पुढील आठवड्यात ७ मे रोजी एक कार्यक्रम घेणार आहेत. ॲपलसाठी हा कार्यक्रम अगदीच महत्त्वाचा असणार आहे. याची दोन मुख्य कारणं असणार आहेत. एक म्हणजे कंपनी ग्राहकांसाठी नवीन आयपॅड आणणार आहे, तसेच आयपॅडची विक्री वाढत नाही आहे; त्यामुळे हा खास कार्यक्रम कंपनीकडून आयोजित केला जाणार आहे.

मार्केट रिसर्च फर्म इंटरनॅशनलच्या डेटा कॉर्पोरेशन (IDC) यांच्या म्हणण्यानुसार ॲपल आयपॅडच्या व्यवसायात घट दिसून आली आहे. २०२३ च्या चौथ्या तिमाहीत जगभरातील टॅबलेट शिपमेंटमध्ये मोठी घसरण झाली. २०२३ मध्ये शिपमेंटमध्ये २० टक्क्यांहून अधिक घट झाली आणि २०११ पासून नवीन नीचांकी पातळी गाठली; असे सांगण्यात आलं आहे.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
adani group stocks gains
Adani Group Shares: काल शेअर बाजार कोसळल्यानंतर आज अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; कारण काय?
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
now buy laptops monitors and printers on Blinkit
दुकानात जाण्याचे टेन्शन दूर! फक्त १० मिनिटांत डिलिव्हर होणार लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर; ‘Blinkit’ची नवीन सेवा सुरू!

हेही वाचा…आता गूगल शिकवणार तुम्हाला इंग्रजी; AIची घेणार मदत, असा होणार ‘या’ फीचरचा वापर

आयपॅड प्रो आणि मिड-रेंज आयपॅड एअर –

ॲपल कंपनीच्या बँकॉकमधील स्टोअरमध्ये आयपॅड लाइनअप प्रदर्शित करण्यात आला आहे. ॲपलचा आयपॅड लाइनअप एक गोंधळात टाकणारा आहे. कारण ग्राहकांना मॅक आणि आयपॅड प्रोमध्ये कोणते प्रोडक्ट निवडावे हे कळत नाहीये. त्यामुळे आयपॅडमध्ये कंपनी अपग्रेड आणत आहे. तसेच दोन्हीमधील किमतीतील फरकही लक्षणीय आहे. यामुळे ॲपल आपल्या आयपॅड लाइनअपची दुरुस्ती करण्यासाठी पुढील आठवड्यात स्प्रिंग इव्हेंट आयोजित करत आहे, ज्यामुळे विक्री वाढविण्यात मदत करू शकते.शिकाऊ लोकांसाठी ॲपल दोन्ही आयपॅड मॉडेल्सवर म्हणजेच हाय-एंड आयपॅड प्रो आणि मिड-रेंज आयपॅड एअर प्रोवर लक्ष केंद्रित करून आयपॅडबद्दल वापरकर्त्यांना असलेल्या समस्यांचे निराकरण व चर्चा करेल.

आयपॅड प्रोला, ओएलईडी स्क्रीन, डिझाइन, M3 चिप किंवा M4 सपोर्टेड, एआय डिव्हाइस आणि मॅजिक कीबोर्ड देण्यात येणार आहे. कंपनी हे प्रोडक्ट दोन साईजमध्ये उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे. हा iPad Pro 11-इंच आकाराचा असेल, तर मोठ्या आयपॅडमध्ये सध्याच्या १२.९ इंच स्क्रीनऐवजी थोडा मोठा १३ इंचाचा डिस्प्ले असेल; तर आयपॅड एअर कदाचित १०.९ इंच आणि १२.९ इंच कॉन्फिगरेशनमध्ये येईल, जे मॅकबूक आणि आयपॅड प्रोबरोबर मिररिंग करेल. नवीन iPad Air ला कदाचित नवीन M2 प्रोसेसर मिळेल. तसेच आयपॅड प्रोच्या मॅजिक कीबोर्डबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वजन कमी असणे, मोठा टचपॅड असणे, अतिरिक्त यूएसबी-सी पोर्ट असणे आणि आयपॅड प्रो वापरण्याचे अधिक मार्ग अनुमती देणारे डिझाइन आदी गोष्टींचा आयपॅड प्रोमध्ये समावेश केला जाणार आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला मोठा आयपॅड हवा असेल तर तुम्ही आयपॅड एअरची निवड करू शकता आणि पैसे वाचवू शकता.

Story img Loader