अ‍ॅपल कंपनीचे फोन हा कायमच अनेकांसाठी आकर्षणाचा, काहींसाठी जिव्हाळ्याचा तर कित्येकांसाठी स्टेटसचा विषय राहिला आहे. बहुतेक मोबाईल युजर्सकडून अ‍ॅपल फोनची निवड ही त्यातील फीचर्स, सुरक्षितता आणि दर्जा यासाठी केली जाते. iPhone जरी आकर्षणाचा विषय असले, तरी त्यांच्या किमती बाजारातील इतर फोनपेक्षा जास्त असल्याचं दिसून येतं. आता मात्र अ‍ॅपल कंपनीनं त्यांच्या आयफोन्सच्या किमती कमी केल्या आहेत. खरंतर मोबाईल युजर्ससाठी ही आनंदाची बातमी असून कोणत्या आयफोन मॉडेले दर कमी झाले आहेत, यासंदर्भात कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृ्त दिलं आहे.

कोणत्या मॉडेल्सच्या किमती झाल्या कमी?

अ‍ॅपलनं घेतलेल्या या दरकपातीच्या निर्णयाचा लाभ काही मोजक्या मॉडेल्सवर घेता येणार आहे. सामान्यपणे प्रो मॉडेल्सवरच्या एमआरपी किमती कंपनीकडून कमी केल्या जात नाहीत. यंदा मात्र अ‍ॅपल आयफोनच्या प्रो मॉडेलच्या किमतींमध्ये घट करण्यात आली आहे. त्यामुळे या श्रेणीतील आयफोनचे दर साधारणपणे ३ ते ४ टक्क्यांनी कमी झाले आहेत. ही बचत जवळपास ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत असल्याचं बोललं जात आहे.

mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Krushi Sevak, Krushi Sevak posts,
मोठी बातमी! २५ ऑगस्टच्या परीक्षेत कृषी सेवकांचा २५८ पदांच्या समावेशासंदर्भात महत्त्वाचा….
MS Dhoni IPL salary
MS Dhoni IPL 2025 : माहीच्या मानधनात तीन पटीने होणार कपात? आयपीएलच्या ‘या’ नियमामुळे कोट्यवधींचा बसणार फटका
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?
light amounts of alcohol increase the risk of cancer
कमी प्रमाणात मद्यपान केल्यानेही वाढू शकतो कर्करोग होण्याचा धोका? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Who is Madhabi Puri Buch
Madhabi Puri Buch : हिंडेनबर्गच्या अहवालामुळे चर्चेत आलेल्या माधबी पुरी बुच कोण? मुंबईत घेतलंय प्राथमिक शिक्षण, तर चीनच्या बँकेतही होत्या सल्लागार!
Satish Menon, Geojit Financial,
‘परताव्याची अपेक्षा १५ टक्क्यांच्या माफक मर्यादेत राखणे यथोचित’
iPhone 15जुनी किंमतनवी किंमतघटलेला दर
१२८ जीबी७९,९००७९,६००३००
२५६ जीबी८९,९००८९,६००३००
५१२ जीबी१,०९,९००१,०९,६००३००
आयफोनच्या कमी झालेल्या किमती

Apple Watch For Kids: तुमचा चिमुकला कुठे आहे हे आता ॲपलचं घड्याळ सांगेल; कसं कराल सेट? स्टेप्स पाहून घ्या

आयफोन प्रो व प्रो मॅक्स मॉडेल्ससाठी भराव्या लागणाऱ्या पैशांमध्ये घट झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यात iPhone 13, iPhone 14 व iPhone 15 या मॉडेल्सचा समावेश आहे. या फोन्सच्या किमती साधारणपणे ३०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे iPhone SE श्रेणीतील फोनच्या किमती जवळपास २३०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. याशिवाय प्रो श्रेणीतील इतर मॉडेल्सच्या किमतीही वेगवेगळ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

iPhone 15 Plusजुनी किंमतनवीन किंमतघटलेला दर
१२८ जीबी८९,६००८९,९००३००
२५६ जीबी९९,९००९९,६००३००
५१२ जीबी१,१९,९००१,१९,६००३००
फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार आयफोनचे जुने व नवीन दर

सर्वात जास्त दरकपात आयफोन १५ प्रो मॉडेलची झाली आहे. आयफोन प्रो १२८ जीबी मॉडेलची किंमत आधी १ लाख ३४ हजार ९०० रुपये इतकी होती. आता हा मोबाईल १ लाख २९ हजार ८०० रुपयांना उपलब्ध असल्याचं फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे या आयफोनची किंमत तब्बल ५ हजार १०० रुपयांनी कमी झाली आहे. याशिवाय आयफोन १५ प्रो मॅक्सची आधीची किंमत १ लाख ५९ हजार ९०० रुपये होती. आता त्याची किंमत १ लाख ५४ हजार इतकी खाली आली आहे.

iPhone 15 Proजुनी किंमतनवी किंमतघटलेला दर
१२८ जीबी१,३४,९००१,२९,८००५१००
२५६ जीबी१,४४,९००१,३९,८००५१००
५१२ जीबी१,६४,९००१,५९,७००५२००
१ टीबी१,८४,९००१,७९,४००५५००
फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार आयफोनचे जुने व नवीन दर

पहिल्यांदाच Pro मॉडेलच्या किमती झाल्या कमी!

दरम्यान, अ‍ॅपलनं पहिल्यांदाच आपल्या प्रो श्रेणीतील आयफोनच्या किमती कमी केल्याचं मानलं जात आहे. साधारणपण नवे प्रो मॉडेल्स बाजारात आल्यानंतर कंपनी आयफोनच्या जुन्या प्रो मॉडेलचं उत्पादन थांबवते. त्यावेळी जुने प्रो मॉडेल आयफोन संबंधित विक्रेते काही डिस्काऊंट देऊन विकतात. पण यावेळी पहिल्यांदाच कंपनीकडून थेट एमआरपी कमी करण्यात आल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

iPhone 15 Pro Maxजुनी किंमतनवी किंमतघटलेले दर
२५६ जीबी१,५९,९००१,५४,०००५९००
५१२ जीबी१,७९,९००१,७३,९००६०००
१ टीबी१,९९,९००१,९३,५००६४००
फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार आयफोनचे जुने व नवीन दर

अर्थसंकल्पातील घोषणेचा परिणाम?

अ‍ॅपलचा हा निर्णय म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. निर्मला सीतारमण यांनी मोबाईल फोनवरील सीमाशुल्कात २० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत कपात केल्याची घोषणा केली. त्याशिवाय, मोबाईलसाठीचे प्रिंटेड सर्किट बोर्ड व मोबाईल चार्जरवरील सीमाशुल्कही कमी केल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

iPhone 14 Plusजुनी किंमतनवी किंमतघटलेले दर
१२८ जीबी६९,९००६९,६००३००
२५६ जीबी७९,९००७९,६००३००
५१२ जीबी९९,९००९९,६००३००
फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार आयफोनचे जुने व नवीन दर

Samsung Galaxy: १०० तास चालणार ‘या’ स्मार्टवॉचची बॅटरी; आजच प्री बुकिंग करा अन् आकर्षक ऑफर्सचा आनंद घ्या

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या घडीला देशात आयात होणाऱ्या स्मार्टफोन्सवर १८ टक्के जीएसटी आणि २२ टक्के सीमाशुल्क आकारलं जातं. सीमाशुल्कावरील १० टक्क्यांचा अधिभार कायम राहतो. यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणेमुळ आता आयात मोबाईल फोनवरील एकूण सीमाशुल्क १६.५ टक्के इतकं (१५ टक्के सीमाशुल्क व त्यावर १० टक्क्यांप्रमाणे १.५ टक्के अधिभार) झालं आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या मोबाईल फोनवर फक्त १८ टक्क्यांचा जीएसी आकारला जाईल.