अॅपल कंपनीचे फोन हा कायमच अनेकांसाठी आकर्षणाचा, काहींसाठी जिव्हाळ्याचा तर कित्येकांसाठी स्टेटसचा विषय राहिला आहे. बहुतेक मोबाईल युजर्सकडून अॅपल फोनची निवड ही त्यातील फीचर्स, सुरक्षितता आणि दर्जा यासाठी केली जाते. iPhone जरी आकर्षणाचा विषय असले, तरी त्यांच्या किमती बाजारातील इतर फोनपेक्षा जास्त असल्याचं दिसून येतं. आता मात्र अॅपल कंपनीनं त्यांच्या आयफोन्सच्या किमती कमी केल्या आहेत. खरंतर मोबाईल युजर्ससाठी ही आनंदाची बातमी असून कोणत्या आयफोन मॉडेले दर कमी झाले आहेत, यासंदर्भात कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृ्त दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोणत्या मॉडेल्सच्या किमती झाल्या कमी?
अॅपलनं घेतलेल्या या दरकपातीच्या निर्णयाचा लाभ काही मोजक्या मॉडेल्सवर घेता येणार आहे. सामान्यपणे प्रो मॉडेल्सवरच्या एमआरपी किमती कंपनीकडून कमी केल्या जात नाहीत. यंदा मात्र अॅपल आयफोनच्या प्रो मॉडेलच्या किमतींमध्ये घट करण्यात आली आहे. त्यामुळे या श्रेणीतील आयफोनचे दर साधारणपणे ३ ते ४ टक्क्यांनी कमी झाले आहेत. ही बचत जवळपास ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत असल्याचं बोललं जात आहे.
iPhone 15 | जुनी किंमत | नवी किंमत | घटलेला दर |
१२८ जीबी | ७९,९०० | ७९,६०० | ३०० |
२५६ जीबी | ८९,९०० | ८९,६०० | ३०० |
५१२ जीबी | १,०९,९०० | १,०९,६०० | ३०० |
आयफोन प्रो व प्रो मॅक्स मॉडेल्ससाठी भराव्या लागणाऱ्या पैशांमध्ये घट झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यात iPhone 13, iPhone 14 व iPhone 15 या मॉडेल्सचा समावेश आहे. या फोन्सच्या किमती साधारणपणे ३०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे iPhone SE श्रेणीतील फोनच्या किमती जवळपास २३०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. याशिवाय प्रो श्रेणीतील इतर मॉडेल्सच्या किमतीही वेगवेगळ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.
iPhone 15 Plus | जुनी किंमत | नवीन किंमत | घटलेला दर |
१२८ जीबी | ८९,६०० | ८९,९०० | ३०० |
२५६ जीबी | ९९,९०० | ९९,६०० | ३०० |
५१२ जीबी | १,१९,९०० | १,१९,६०० | ३०० |
सर्वात जास्त दरकपात आयफोन १५ प्रो मॉडेलची झाली आहे. आयफोन प्रो १२८ जीबी मॉडेलची किंमत आधी १ लाख ३४ हजार ९०० रुपये इतकी होती. आता हा मोबाईल १ लाख २९ हजार ८०० रुपयांना उपलब्ध असल्याचं फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे या आयफोनची किंमत तब्बल ५ हजार १०० रुपयांनी कमी झाली आहे. याशिवाय आयफोन १५ प्रो मॅक्सची आधीची किंमत १ लाख ५९ हजार ९०० रुपये होती. आता त्याची किंमत १ लाख ५४ हजार इतकी खाली आली आहे.
iPhone 15 Pro | जुनी किंमत | नवी किंमत | घटलेला दर |
१२८ जीबी | १,३४,९०० | १,२९,८०० | ५१०० |
२५६ जीबी | १,४४,९०० | १,३९,८०० | ५१०० |
५१२ जीबी | १,६४,९०० | १,५९,७०० | ५२०० |
१ टीबी | १,८४,९०० | १,७९,४०० | ५५०० |
पहिल्यांदाच Pro मॉडेलच्या किमती झाल्या कमी!
दरम्यान, अॅपलनं पहिल्यांदाच आपल्या प्रो श्रेणीतील आयफोनच्या किमती कमी केल्याचं मानलं जात आहे. साधारणपण नवे प्रो मॉडेल्स बाजारात आल्यानंतर कंपनी आयफोनच्या जुन्या प्रो मॉडेलचं उत्पादन थांबवते. त्यावेळी जुने प्रो मॉडेल आयफोन संबंधित विक्रेते काही डिस्काऊंट देऊन विकतात. पण यावेळी पहिल्यांदाच कंपनीकडून थेट एमआरपी कमी करण्यात आल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
iPhone 15 Pro Max | जुनी किंमत | नवी किंमत | घटलेले दर |
२५६ जीबी | १,५९,९०० | १,५४,००० | ५९०० |
५१२ जीबी | १,७९,९०० | १,७३,९०० | ६००० |
१ टीबी | १,९९,९०० | १,९३,५०० | ६४०० |
अर्थसंकल्पातील घोषणेचा परिणाम?
अॅपलचा हा निर्णय म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. निर्मला सीतारमण यांनी मोबाईल फोनवरील सीमाशुल्कात २० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत कपात केल्याची घोषणा केली. त्याशिवाय, मोबाईलसाठीचे प्रिंटेड सर्किट बोर्ड व मोबाईल चार्जरवरील सीमाशुल्कही कमी केल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
iPhone 14 Plus | जुनी किंमत | नवी किंमत | घटलेले दर |
१२८ जीबी | ६९,९०० | ६९,६०० | ३०० |
२५६ जीबी | ७९,९०० | ७९,६०० | ३०० |
५१२ जीबी | ९९,९०० | ९९,६०० | ३०० |
हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या घडीला देशात आयात होणाऱ्या स्मार्टफोन्सवर १८ टक्के जीएसटी आणि २२ टक्के सीमाशुल्क आकारलं जातं. सीमाशुल्कावरील १० टक्क्यांचा अधिभार कायम राहतो. यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणेमुळ आता आयात मोबाईल फोनवरील एकूण सीमाशुल्क १६.५ टक्के इतकं (१५ टक्के सीमाशुल्क व त्यावर १० टक्क्यांप्रमाणे १.५ टक्के अधिभार) झालं आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या मोबाईल फोनवर फक्त १८ टक्क्यांचा जीएसी आकारला जाईल.