Apple कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतीक्षित १५ सिरीज लॉन्च केली आहे. त्यामध्ये आयफोन १५ , आयफोन १५ प्लस तसेच आयफोन १५ प्रो आणि याफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. याचे प्री- बुकिंग सुरु झाले आहे. तसेच २२ सप्टेंबरपासून या मॉडेल्सची विक्री सुरु होणार आहे. तसेच काल कंपनीने आयफोन वापरकर्त्यांसाठी iOS 17 रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. iOS 17 ही आयफोन्ससाठी नवीन अशी एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
Apple ने WWDC 2023 मध्ये iOS 17 या नवीन ऑपरेटिंग सिस्टीमची घोषणा केली होती. आतापर्यंत iOS 17 केवळ पब्लिक बीटावर उपलब्ध होते. कालपासून कंपनीने वापरकर्त्यांसाठी स्टेबल अपडेट सादर केले आहे. काल रात्री १० वाजल्यापासून हे नवीन अपडेट भारतात रोल आऊट होण्यास सुरवात झाली आहे. आयफोन XS नंतर लॉन्च केलेल्या आयफोन मॉडेल्नंतर लॉन्च झालेल्या मॉडेल्समध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टीम डाउनलोड आणि इन्स्टॉल करता येणार आहे. कोणकोणत्या फोनमध्ये हे डाउनलोड करता येणार आहे ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
iOS 17 ऑपरेटिंग सिस्टीम डाउनलोड करता येणारे आयफोन
आयफोन १४
आयफोन १४ प्लस
आयफोन १४ प्रो
आयफोन १४ प्रो मॅक्स
आयफोन १३
आयफोन १३ मिनी
आयफोन १३ मिनी प्रो
आयफोन १३ मिनी प्रो मॅक्स
आयफोन १२
आयफोन १२ मिनी
आयफोन १२ प्रो
आयफोन १२ प्रो मॅक्स
आयफोन ११
आयफोन ११ प्रो
आयफोन ११ प्रो मॅक्स
आयफोन XS
आयफोन XS मॅक्स
आयफोन XR
आयफोन SE (२ री जनरेशन )
हेही वाचा : OnePlus ने उघड केले ‘या’ नवीन टॅबलेटचे डिझाइन; कधी होणार लॉन्च? जाणून घ्या
आयफोन वापरकर्त्यांना iOS 17 हे OTA अपडेटच्या रूपात मिळायला सुरुवात झाली आहे. हे डायरेक्ट डाउनलोड केले जाऊ शकते. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम अनेक फीचर्ससह येते. यामधील कंपंनीने आयफोन १५ सिरीजच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सादर केले होते.