Apple role out ios 16.2 for iphone users : अ‍ॅपलने पात्र आयफोन युजर्ससाठी iOS 16.2 update उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या आयफोनवर ५ जी वापरता येणार आहे. देशात ५ जी सेवा सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. मात्र, काही मोजक्याच स्मार्टफोन्समध्ये ही सुविधा सुरू होती. अ‍ॅपलचे नवीन आणि काही जुन्या सिरीजचे फोन्स ५ जी सपोर्ट करतात, मात्र अपडेटमुळे युजर्सना ५ जी सेवेचा लाभ घेता आला नाही. आता मात्र, अपडेट उपलब्ध होत असल्याने आयफोन युजरला देखील वेगवान इंटरनेटचा वापर करता येणार आहे.

१ ऑक्टोबर रोजी देशात ५ जी सेवा लाँच झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत एअरटेल आणि रिलायन्स जिओने देशातील ५० शहरांमध्ये आपली ५ जी सेवा विस्तारली आहे. एअरटेल आणि रिलायन्स जिओ हे दोन्ही भारतातील आयफोनचे कॅरिअर पार्टनर आहेत.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
Happy Children's Day 2024
Happy Children’s Day 2024 : जपान आणि भारताची मैत्री कशी झाली? नेहरूंनी टोकियोच्या मुलांना ‘हत्ती’ भेट दिल्याची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला?
aamir give advice to kiran rao to be nice wife
घटस्फोटानंतर चांगली जोडीदार होण्यासाठी सल्ला देणाऱ्या आमिर खानला किरण राव म्हणाली, “मी…”

(ओला, उबेर वापरताना होईल मोठी बचत! अचानक भाववाढ दिसल्यास करा ‘हे’ उपाय, प्रवासासाठी ठरेल फायदेशीर)

५ जी सेल्युलर सपोर्टसह iOS 16.2 मध्ये काही नवीन फीचर्स देखील मिळत आहे. यामध्ये अ‍ॅपल म्युझिक सिंग, न्यू होम अ‍ॅप आर्चिटेक्चर, डिस्प्लेवर नेहमीसाठी वॉलपेपर आणि नोटिफिकेशन डिसॅबल करणे, लॉक स्क्रीन स्लिप विजगेट, एअर टॅग अलर्ट, सिरी साइलेंट रेसपॉन्सचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात अ‍ॅपलने आयओएस १६ बिटा सॉफ्टवेअर प्रोग्राम अंतर्गत चाचणीच्या आधारावर काही निवडक आयफोन युजर्ससाठी ५ जी सेवा सुरू केली होती. निवडक ५ जी युजर्सना एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या कनेक्शनद्वारे ५ जी वापरता येत होते. युजरला आयओएस १६.२ इन्स्टॉल करावे लागेल, असे कंपनीने म्हटले होते. आयफोन युजरला सुपर फास्ट डाऊनलोड आणि अपलोड, चांगली स्ट्रिमिंग आणि रिअल टाइम ५ जी कनेक्टिव्हिटी मिळेल, असे अ‍ॅपलचे म्हणणे आहे.

(ओला, उबेर वापरताना होईल मोठी बचत! अचानक भाववाढ दिसल्यास करा ‘हे’ उपाय, प्रवासासाठी ठरेल फायदेशीर)

या फोनमध्ये चालणार ५ जी

आयफोन १४, आयफोन १४ प्लस, आयफोन १४ प्रो, आयफोन १४ प्रो मॅक्स, आयफोन १३, आयफोन १३ मिनी, आयफोन १३ प्रो, आयफोन १३ प्रो मॅक्स, आयफोन १२, आयफोन १२ मिनी, आयफोन १२ प्रो, आयफोन १२ प्रो मॅक्स, आयफोन एसई (तिसरी पीढी)