दिग्गज टेक कंपनी असणारी Apple Inc. AI चॅटबॉटवर काम करत आहे. जो ओपनआय, गुगलच्या चॅटबॉटला आव्हान देऊ शकतो. मात्र कंपनीने ग्राहकांसाठी ही टेक्नॉलॉजी जाहीर करण्याबाबत स्पष्ट धोरण आखलेले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt चॅटबॉट लॉन्च केला आहे. त्याला स्पर्धा म्हणून गुगलने आपला Bard आणि मायक्रोसॉफ्टने देखील आपला चॅटबॉट लॉन्च केला आहे. सध्या जगभरामध्ये अनेक क्षेत्रात AI चा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपला AI चॅटबॉट लॉन्च करत आहेत अनेक जण त्यावर काम करत आहेत.

आयफोन निर्मात्या कंपनीने भाषेचे मोठे मॉडेल तयार करण्यासाठी आपले स्वतःचे फ्रेमवर्क तयार केले आहे. ChatGPT आणि गुगल Bard सारख्या नवीन ऑफरच्या केंद्रस्थानी AI आधारित सिस्टीम आहे. “Ajax” या नावाने ओळखल्या जाणार्‍या त्या फाउंडेशनसह Apple ने चॅटबॉट सेवा देखील तयार केली आहे ज्याला काही इंजिनिअर्स “Apple GPT” असे म्हणत आहेत. याबाबतचे वृत्त bloomberg ने दिले आहे.

हेही वाचा : Netflix चा मोठा निर्णय! आजपासून भारतात पासवर्ड शेअरिंग बंद, जाणून घ्या नेमका बदल…

ब्लूमबर्गने बुधवारी apple AI वर काम करत असल्याचा रिपोर्ट दिल्यानंतर Apple च्या शेअर्समध्ये २.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ १९८.२३ डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, ओपनएआयचे भागीदार आणि मुख्य पाठीराखे यांच्या शेअर्स या बातमीमुळे १ टक्क्यांनी घसरले. Apple ने यावर टिप्पणी करण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

ओपनआयचा चॅटजीपीटी, गुगल बार्ड आणि मायक्रोसॉफ्टच्या बिंग या AI मुळे कंपनीची चिंता वाढली होती. अ‍ॅपलने अनेक वर्षांपासून आपल्या प्रॉडक्ट्समध्ये AI फीचर्स समाविष्ट केली आहेत. सध्या लॉन्च झालेले चॅटबॉट हे टेक्स्ट प्रॉम्प्टवर आधारित निबंध, फोटो आणि व्हिडीओ देखील तयार करू शकतात. अ‍ॅपल त्याचे मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादन, सिरी व्हॉईस असिस्टंट, अलिकडच्या वर्षांत काही प्रमाणात स्थिर झाले आहे. मात्र कंपनीने iPhone वर फोटोंमध्ये सुधारणा आणि सर्च यासह इतर क्षेत्रांमध्ये AI प्रगती केली आहे. या वर्षी त्याच्या मोबाइल डिव्हाइसवर ऑटो-करेक्टची एक स्मार्ट व्हर्जन देखील येत आहे.

हेही वाचा : डाऊन झालेले WhatsApp काही तासांमध्ये पूर्वपदावर, भारतात ‘इतक्या’ वापरकर्त्यांना आल्या समस्या

सार्वजनिकरित्या, कंपनीचे सीईओ टीम कूक हे नवीन AI सेवांबद्दल बाजारपेठेत येणाऱ्या माहितीवरून सावधगिरी बाळगत आहेत. जरी टेक्नॉलॉजीची क्षमता आहे तरीही “अनेक समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.” असे ते मे महिन्यात एका कॉन्फरन्स कॉल दरम्यान म्हणाले होते. अ‍ॅपल त्याच्या अधिक उत्पादनांमध्ये एआय जोडणार आहे, ते म्हणाले, परंतु “अत्यंत विचारपूर्वक.” गुड मॉर्निंग अमेरिका ला दिलेल्या मुलाखतीत, कूक म्हणाले की मी चॅटजीपीटी वापरतो आणि हे असे काही आहे ज्यावर कंपनी “जवळून पाहत आहे.”

Story img Loader