ॲपल कंपनी वार्षिक परंपरेचे पालन करून नवीन वर्षात नवीन आयफोन म्हणजेच आयफोन १६ सीरिज लाँच करणार आहे. गेल्या वर्षी आयफोन १५ ही सीरिज ग्राहकांच्या पसंतीस उतरली. तर, आता कंपनी आगामी आयफोन १६ सीरिजमध्ये काहीतरी खास घेऊन येणार आहे. ॲपलच्या आगामी आयफोन १६ प्रो (iPhone 16 Pro) आणि आयफोन १६ प्रो मॅक्स (iPhone 16 Pro Max) मध्ये सर्वांत पातळ स्क्रीन बेजेल्स (bezels) असणार आहे.
ॲपलच्या आगामी आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये केवळ आयफोनवर पाहिलेले सर्वांत पातळ स्क्रीन बेझल्सच नाही, तर आजपर्यंतच्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये नसणारे आणि चीनमधून पाठविण्यात आलेले अनेक फीचर्ससुद्धा असणार आहेत. सीरियल टिपस्टर आइस युनिव्हर्स (@UniverseIce on X) ने यासंबंधित ट्विट केले आहे. आयफोन १६ (iPhone 16) ही मालिका लाँच होण्यासाठी अजून बरेच महिने बाकी आहेत आणि आता कंपनीकडून दावा करण्यात आला आहे की, आयफोन १६ सीरिजमध्ये एआयवर (AI ) चालणारी विविध फीचर्स, रॅम आणि स्टोरेज असणार आहे.
पोस्ट नक्की बघा…
आयफोन १६ प्रोमध्ये फक्त १.२ आकाराचा बेझल्स, तर आयफोन १६ प्रो मॅक्स १५ मिमी आकाराचा बेझल्स असणार आहे. तुलना करायची झाल्यास आयफोन १५ प्रोचा बेझल्स १.७१ आकाराइतका जाड आहे. हा फरक किरकोळ वाटत असला तरीही जेव्हा तुम्ही फोन समोरासमोर ठेवाल तेव्हा बेझल्सच्या आकारातील फरक दिसून येईल. नवीन आयपॅड प्रो हे त्याचे आतापर्यंतचे सर्वांत पातळ म्हणजे आयपॅड नॅनो iPod Nano पेक्षाही पातळ उत्पादन असणार आहे. तसेच आयफोन १६ सीरिजमध्ये पातळ बेझल्ससह अधिक इमर्सिव्ह डिस्प्ले अनुभवसुद्धा देणार आहे. शेवटच्या क्षणी अपडेटमध्ये बदलसुद्धा घडवू शकतात. ॲपलच्या WWDC २०२४ लाँच इव्हेंट १० जून रोजी होणार आहे. तसेच काही दिवसांत ॲपल त्यांच्या उपकरणांना एकत्र करण्याच्या दृष्टीने एआय (AI)सारख्या अनेक योजनासुद्धा आखत आहे.