ॲपल कंपनी वार्षिक परंपरेचे पालन करून नवीन वर्षात नवीन आयफोन म्हणजेच आयफोन १६ सीरिज लाँच करणार आहे. गेल्या वर्षी आयफोन १५ सीरिज ग्राहकांच्या पसंतीस उतरली. तर आता कंपनी आगामी आयफोन १६ सीरिजमध्ये काही तरी खास घेऊन येणार आहे.
आयफोन १६ (iPhone 16) मालिका लाँच होण्यासाठी अजून बरेच महिने बाकी आहेत आणि आता कंपनीकडून दावा करण्यात आला आहे की, आयफोन १६ सीरिजमध्ये विविध एआयवर (AI ) चालणारी फीचर्स रॅम आणि स्टोरेज असणार आहे. आत्ता ॲपल आयफोन १५ प्रो (Apple iPhone 15 Pro) सीरिजवर ८ जीबी रॅम आणि आयफोन १५, आयफोन १५ प्लसवर ६ जीबी रॅम ऑफर करते. त्यामुळे कंपनी आयफोन १६ सिरीजमध्ये अधिक रॅम समाविष्ट करेल.
एक्स (ट्विटर) वर Tech_Reve च्या पोस्टनुसार, आगामी आयफोन १६ सिरीज ग्राहकांना अधिक रॅम आणि स्टोरेज दोन्ही ऑफर करेल. नुकत्याच लाँच झालेल्या सॅमसंग गॅलॅक्सी एस २४ सिरीज आणि गूगल पिक्सेल ८ सिरीजमध्ये एआय सक्षम फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.
हेही वाचा…‘गूगल पे’ ची मूळ कल्पना कुणाची ? भारतात ऑनलाईन पेमेंटची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या…
ॲपल सध्या आयफोन १५ प्रो मॉडेल्सवर ८ जीबी रॅम आणि आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लसवर ६ जीबी रॅम ऑफर करतो. याचा विचार करून कंपनी आयफोन १६ लाइनअपमध्ये रॅममध्ये काही खास गोष्टी देऊ शकते. ॲपल हा एकमेव स्मार्टफोन ब्रँड आहे जो, NAND फ्लॅश-आधारित स्टोरेज वापरतो. म्हणून स्टोरेजची समस्या ग्राहकांना येऊ नये यासाठी कंपनी या वर्षापासून प्रो मॉडेल्सवर, आयफोन १६ सीरिजसह २५६ जीबी स्टोरेज प्रदान करू शकते.
गूगलने अलीकडेच पुष्टी केली आहे की, पिक्सेल ८ वापरकर्ते हार्डवेअर मर्यादांमुळे जेमिनी नॅनो डिव्हाइसवर चालवू शकणार नाहीत ; ज्यामध्ये समान प्रोसेसर आहे, पण अधिक मेमरी देते. या गोष्टीचा विचार करता हे अगदी स्पष्ट होते की, कंपनी आयफोन १६ मध्ये अधिक मेमरी देऊ शकते.
अलीकडे, ॲपलने गूगल आणि ओपन एआय बरोबर पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला आहे ; जेणेकरून त्यांच्या उपकरणांमध्ये एआय फीचर्स प्रदान केली जातील. एका रिपोर्टनुसार गूगल ‘जेमिनी एआय’ ॲपल उपकरणांमध्ये उपलब्ध करून देऊ शकते. ॲपल चा हा पहिला स्मार्टफोन असेल ; जो ऑन-बोर्ड एआय फीचरला सपोर्ट करेल.त्यामुळे आयफोन १६ ग्राहकांना आता नव्या स्टाईल आणि फीचर्ससह दिसून येईल