ॲपल ही एक टेक कंपनी आहे. तसेच ही कंपनी आयफोन , मॅकबुक, स्मार्टवॉच आणि अन्य गोष्टींचे उत्पादन करते. तर आता ॲपल कंपनीने व्हॅलेंटाईन डे २०२४ साठी सेलची घोषणा केली आहे. कंपनी नवीन ॲक्सेसरीज जसे की, रंगीबेरंगी आयफोन कव्हर, प्रोडक्ट्सवर खास ऑफर आणि ॲपल वॉचसाठी नवीन बँड सादर करत आहेत. व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू द्यायची असेल तर ॲपल डिव्हाइससाठी ॲक्सेसरीज खरेदी करण्याची ही उत्तम वेळ ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणते प्रोडक्ट्स या सेलमध्ये उपलब्ध असणार आहेत ते पाहू. तसेच लक्षात ठेवा की, या खास प्रोडक्ट्सची विक्री सध्या ॲपल स्टोअरवर आणि काही ऑनलाइनसुद्धा उपलब्ध असणार आहे.

१. एअरपॉड्स आणि ॲपल पेन्सिलवर इमोजी किंवा अक्षर कोरून घेऊ शकता :
जर तुम्ही नवीन एअरपॉड्स किंवा ॲपल पेन्सिल खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर या सेलमध्ये तुम्ही या उत्पादनांवर तुमच्या नावाचे पहिले अक्षर किंवा इमोजी कोरून घेऊ शकता. एअरपॉड्सपासून ते यूएसबी-सी सह नवीन एअरपॉड्स प्रोपर्यंत ॲपल स्टोअरवर खरेदी केलेल्या एअरपॉड्सचे सर्व मॉडेल्सवर इमोजी किंवा अक्षरे विनामूल्य कोरून दिली जाऊ शकतात.

२. आयफोन १५, आयफोन १५ प्रोसाठी नवीन रंगाचे कव्हर :
व्हॅलेंटाईन डे सेलचा एक भाग म्हणून ॲपल नवीन सीरिजच्या कव्हरसाठी रंग सादर करणार आहे, ज्यात आयफोन १५ प्रो मॅक्ससाठी नवीन हिरवा रंग, आयफोन १५ प्लससाठी ऑरेंज सॉर्बेट रंग, सिलिकॉन कव्हर आणि बेसलाइनसाठी फिकट गुलाबी रंगाचा समावेश असणार आहे. आयफोन १५च्या कव्हरसाठी सुरुवातीची किंमत या सेलमध्ये ४,९९० रुपये असणार आहे.

हेही वाचा…कॉम्प्युटर, लॅपटॉप वापरताना ‘या’ शॉर्टकट Keys ची होईल मदत; वाचवा वेळ, तुम्हाला किती माहित होते? सांगा

३. १० व्या जनरल आयपॅडसाठी नवीन Folio कव्हर :
तुमच्याकडे १०वा जनरल आयपॅड असल्यास तुम्ही आता अगदी नवीन कलिंगड फळाच्या रंगाचा Folio कव्हर खरेदी करू शकतात. या Folio केस कव्हरची किंमत ८,९०० रुपये आहे आणि हे पांढऱ्या आणि आकाशी रंगांमध्येदेखील उपलब्ध आहे.

४. घड्याळासाठी नवीन बँड :
ॲपल वॉचसाठी ग्वाव्हा आणि बेज रंगाचे सोलो लूप बँड सादर करत आहे (वॉच मालिका ९ साठी). हे बँड केवळ ॲपल स्टोअरवर विविध साईजमध्ये उपलब्ध असतील. या खास वस्तू तुम्ही सेलमध्ये खरेदी करू शकणार आहात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple valentines day sale from free engravings to iphone accessories unique gifts for iphones lovers asp
Show comments