झोप ही माणसासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. झोप व्यवस्थित पूर्ण न होणे ही आरोग्यासाठी धोकादायक आहे. रात्री उशिरापर्यंत चालणारी पार्टी, मॉर्निंग शिफ्ट किंवा टेन्शनमुळे झोप पुर्ण न होण्याच्या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत आहे. झोप न लागणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. शिवाय झोप न येण्याची समस्या सर्वात जास्त तरूणांमध्ये पाहायला मिळत आहे. झोप न लागल्यामुळे चिडचिड, भूक न लागणे अशा अनेक समस्या उद्भवतात. आपल्या झोपेवर बदलत्या जीवनशैलीचाही मोठा प्रभाव आहे.
एका रिपोर्टनुसार ही मोठ्या प्रमाणात लोकं पुरेशी झोप घेत नाहीत. Apple हार्ट अँड मुमेंट स्टडी (Apple Heart and Movement Study) च्या डेटाचा वापर करत संशोधकांनी ही माहिती दिली आहे. अमेरिकेतील ब्रिघम आणि महिला रुग्णालयाने या महिन्यात प्रकाशित केलेला हा अभ्यास ४२,००० हून अधिक अॅपल वॉच वापरकर्त्यांच्या झोपेच्या डेटावर आधारित आहे.
Abc न्यूज ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेतील ब्रिघम आणि महिला रुग्णालयाच्या संशोधकांनी अधिक अॅपल वॉच वापरकर्त्यांच्या २९ लाखांपेक्षा जास्त रात्रीच्या झोपेचे विश्लेषण केले आहे. यात संशोधकांना जी माहिती मिळाली ती थक्क करणारी आहे. यामध्ये असे समोर आले आहे की, ३१ टक्केच लोकं रात्रीची कमीत कमी 7 तासांची झोप घेतात. खरेतर रिपोर्टच्या माहितीनुसार एक निरोगी प्रौढ व्यक्तीला 7 तासांची झोप आवश्यक असते.
अॅपलने २०१९ मध्ये या अभ्यासाची घोषणा केली होती ज्याद्वारे संशोधकांनी अॅपल हार्ट आणि मूव्हमेंट स्टडीद्वारे डेटा गोळा केला आहे. या डेटाचा उपयोग जेव्हा संशोधकांनी केला तेव्हा त्यांना आणखी काही आकडेवारी मिळाली. ही आकडेवारी अमेरिकन लोकांची दिनचर्या दर्शवते. यातून एक अंदाज नक्की समोर येतो तो म्हणजे पण जगभरात लोकांची झोप कमी कशी होत आहे आणि त्याचा परिणाम भविष्यात त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
अभ्यासाचे विश्लेषण करताना संशोधकाना असे आढळून आले की विक डेज म्हणजेच सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये ६६.४ लोकं रात्रीच्या १२ आधी झोपायला जातात. परंतु सुट्टीच्या दिवसांमध्ये म्हणजेच शनिवार-रविवारमध्ये ही संख्या कमी होऊ ५६.६ टक्के इतकीच राहते. वॅाशिंग्टनमध्ये ७ तासांपेक्षा जास्त झोप घेणारे ३८.३ टक्के लोक आहेत. तर हवाई शहरामध्ये ७ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणाऱ्य लोकांची संख्या खूपच कमी आहे.
अभ्यासात सहभागी एकूण ४२,४५५ लोकांच्या झोपेचे प्रमाण असे दर्शविते की प्रति व्यक्ती सरासरी झोपेची वेळ रात्री ६ तास २७ मिनिटे इतकी होती. दुसरीकडे, अमेरिकन हार्ट असोसिएशन दररोज रात्री ७ ते ९ तास झोपण्याची शिफारस करते. यापेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना हृदयाशी संबंधित आजारांसह तणाव, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.